बांगलादेशी महिला चक्क पश्चिम बंगालमध्ये बनली सरपंच!

कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल 

बांगलादेशी महिला चक्क पश्चिम बंगालमध्ये बनली सरपंच!

बांगलादेशातील एक महिला मालदा येथील ग्रामपंचायतीची प्रमुख बनली आहे. या संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याच्या आरोपानंतर न्यायमूर्ती अमृता सिन्हा यांच्या खंडपीठासमोर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे.

पश्चिम बंगालमधील रशीदाबाद ग्रामपंचायतीचे हे प्रकरण आहे. मालदा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील रशीदाबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच असलेल्या लवली खातून या मूळच्या बांगलादेशी असल्याचे सांगितले जात आहे. त्या अनिवासी बांगलादेशी असून त्यांनी पासपोर्टशिवाय बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी एका महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये तिने लवली खातून ही मूळची बांगलादेशची असल्याचा दावा केला आहे. तिचे खरे नाव नसिया शेख असल्याचे याचिकेत म्हटले आहे. बांगलादेशातून ती अवैधरित्या भारतात आली. तिने बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवून पंचायत निवडणूक लढवली आणि यानंतर ती प्रमुख बनली, असा आरोप लवली खातून यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

रेहाना सुल्तान यांनी २०२४ साली कोलकात्यामधील उच्च न्यायालयामध्ये लवली खातून यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. रेहाना यांनी २०२२ साली ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये त्यांचा लवली खातून यांच्याकडून पराभव झाला होता.

Exit mobile version