खंडेराजुरी येथील मराठा समाजातील महाविद्यालीयान तरुणी कु. स्वाती रामचंद्र जाधव हिला एकतर्फी प्रेमातून त्याच गावातील मुस्लिम तरुण आरोपी नराधम साहिल डफेदार याच्या त्रासाला कंटाळून ४ दिवसांपूर्वी मराठा समाजातील तरुणीने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले. कु. स्वाती रामचंद्र जाधव यांच्या घरी जाऊन यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून घडलेल्या घटनेची चौकशी केली असता आरोपी नराधम साहिल डफेदार हा गेले दीड वर्ष सातत्याने ती कॉलेजला जात असताना खंडेराजुरी ते मिरजेतील कॉलेजपर्यंत येता जाता तिला तो त्रास देत होता. दोन-तीन वेळा या मराठा समाजातील कुटुंबांनी डफेदार कुटुंबीयांना या त्रासाबद्दल कल्पना दिली होती तरीसुद्धा दखल घेत नाही म्हणून या मराठा समाजातील कु. स्वाती रामचंद्र जाधव हिने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले.
या कुटुंबीयांशी बोलताना माजी आमदार आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रमुख नितीन शिंदे म्हणाली की, आरोपी नराधम साहिल डफेदार याला फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारी वकिलाची नेमणूक करणे, खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणे, उज्ज्वल निकम यांच्यासारख्या चांगल्या सरकारी वकीलाची नेमणूक करावी, गावातील ग्रामसभेमध्ये ठराव करून डफेदार कुटुंबीयांना गावाबाहेर काढण्यात यावे, आरोपी नराधम साहील डफेदार याच्या अतिक्रमण केलेल्या घरावर बुलडोझर फिरवावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत. जाधव कुटुंबीयांनी मुलीचा विवाह होणार नाही, समाजामध्ये अब्रू जाईल या भीतीपोटी पोलीस स्टेशन अथवा सामाजिक संघटना यांना कल्पना दिली नाही याचा परिणाम त्यांना आपली एक मुलगी गमवावी लागली. यापुढे अब्रूच्या भीतीपोटी मराठा समाजाने लपवून ठेवू नका वेळीच कल्पना द्या असेही माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले.
हे ही वाचा:
शिवरायांच्या पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे, सरकार मोठा पुतळा उभारेल !
मध्य प्रदेशातील पोलिस ठाण्यावर दगड फेकणारा शहजाद अली पोलिसांच्या ताब्यात !
बांगलादेशातील सत्तापालटामुळे अदानींची मोठी रक्कम अडकली !
ममतांविरोधात डॉक्टरांचे ‘नबन्ना अभियान’, पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर, पाण्याचा मारा !
तसेच मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे मागणी करणार असून जोपर्यंत या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत या सर्व संघटना गप्प बसणार नाहीत. तसेच या कुटुंबियांना भेट दिल्यामुळे गावकऱ्यांनी सुद्धा निषेध मोर्चा व खंडेराजुरी बंदचे आवाहन केलेले आहे.
यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, दिनकर भोसले भाजपा तालुका अध्यक्ष, शिवसेना अक्षय माने, अशोक बने, विष्णुपंत पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई, तानाजी भोसले, दादासाहेब पाटील, सोमनाथ घोडखिंडे, परशुराम चोरगे, बाळासाहेब मोठेकर, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, मनोज साळुंखे, दादासाहेब पाटील आदींसह अखिल भारतीय मराठा महासंघ, हिंदू एकता आंदोलन, भाजपा, शिवसेना, आम्ही शिवभक्त संघटना प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.