23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषबिहारच्या चंपारणमध्ये 'लव्ह जिहाद'!

बिहारच्या चंपारणमध्ये ‘लव्ह जिहाद’!

अल्पवयीन मुलीशी फसवून लग्न केले, नेपाळला विकण्याचा होता कट

Google News Follow

Related

बिहारमधील पूर्व चम्पारण येथे ‘लव्ह जिहाद’ चे एक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटात हायलाइट केलेल्या मोडस ऑपरेंडीशी संलग्न आहे. या प्रकरणी सशस्त्र सीमा बलाच्या जवानांनी समीर आलम नामक एका विवाहित पुरुषाला अटक केली आहे. शनिवार, २० एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. त्याच्यावर एका हिंदू समाजातील अल्पवयीन मुलीशी खोटे बोलून लग्न केले तसेच तिला नेपाळला नेण्याचे आमिष दाखवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यापूर्वी सुद्धा त्याने गैर मुस्लीम मुलींना इस्लाम स्वीकारल्यानंतर त्यांची विक्री केल्याचाही आरोप आहे.

एका अहवालानुसार बिहारच्या नरकटियागंजमधील एक १७ वर्षीय हिंदू मुलगी तिची मैत्रिण असलेल्या सलमा खातूनच्या घरी वारंवार जायची. एकदा ती सलमासोबत एका लग्न समारंभात गेली होती. तेथे तिची आणी यातील आरोपी समीरची भेट झाली. त्यानंतर तो तिच्याशी बोलण्याचा सतत प्रयत्न करत होता. मात्र ति त्याला नकार देत होती तरीही त्याने तिचा पाठलाग सोडला नाही. ति शाळेत गेल्यानंतर तो तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांनी तिने त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली मात्र समीरने आपण मुस्लीम असल्याचे स्पष्ट केले नाही. दोन महिन्यानंतर समीरने तिला घरी येण्याचा हट्ट केला.

हेही वाचा..

ममता सरकारला मोठा झटका, कोलकाता उच्च न्यायालयाने शिक्षक भरती केली रद्द!

सलमान खानच्या घराजवळ गोळीबार करून पिस्तुल तापी नदीत फेकल्याची आरोपींची कबुली

मणिपूरमधील ११ बूथवर पुन्हा मतदान!

आयपीएलमध्ये सर्वाधिक लांब षटकार ठोकणारे टॉप पाच फलंदाज

सुरुवातीला तिने नकार दिला पण नंतर ति येण्यास तयार झाली. शाळेतून ति त्याच्या घरी गेली. त्यावेळी घरी अनेक महिला हजर असताना समीरने तिच्या कपाळी सिंदूर लावण्याचा प्रयत्न केला, लग्नानंतर तिला त्याने घरी डांबून ठेवले होते. तिचा फोन काढून घेतला होता. तिने दोनवेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, असे तिने पोलिसांना सांगितले.
समीरने तिला नेपाळमध्ये विकण्याचा कट रचला होता. त्याची योजना पूर्ण करण्यासाठी, त्याने तिला एक दिवस रक्सौल मार्केटमध्ये जाऊया असे सांगितले. तिला नेपाळ सीमेकडे घेऊन जात असताना सीमेवर तैनात असलेल्या एसएसबीच्या ४७ व्या बटालियनचे इन्स्पेक्टर मनोज कुमार शर्मा यांनी त्यांना पाहिले. संशयास्पद वाटून त्याने समीरला विचारपूस केली. समीरच्या बोलण्याच्या पद्धतीनं त्याचा संशय आणखी वाढला. जेव्हा तो मुलीशी बोलला तेव्हा ती गप्प होती. ति काहीच बोलली नाही.
त्यानंतर निरीक्षक मनोज शर्मा यांनी समीर आणि पीडितेला पोलिस ठाण्यात आणले. नंतर त्यांनी समीरच्या मोबाईलमधून अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो पाहिले. ११ मे २०२२ रोजी दलित समाजातील अल्पवयीन मुलीची तस्करी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. समीर आलम हा मूळचा बेतियाचा रहिवासी आणि मोहम्मद गुड्डू मियाँचा मुलगा असल्याचे तपासात स्पष्ट झाले. चौकशीत समीर आलमने अल्पवयीन मुलीला नेपाळला नेऊन तिची विक्री करण्याचा विचार केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर रक्सौल येथील सामाजिक कार्यकर्ते रणजीत सिंग यांनी समीर आलमविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा