उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकरचा आवाज बंद

मुख्यमंत्री योगी यांच्या आदेशानंतर तीन हजार स्पीकरवर कारवाई

उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकरचा आवाज बंद

बुलडोझर कारवाईवरून देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता लाऊडस्पीकर कारवाईवरून पुन्हा चर्चेत आले आहेत. लाऊडस्पीकर हटवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे संपूर्ण राज्यभर ही मोहीम कठोरपणे राबविली जात आहे. मंदिर असो अथवा मशिद, आरसी असो वा अजान… धार्मिक स्थळांवर नियमबाह्य पद्धतीने लाऊडस्पीकर सुरू असतील, तर ते उतरवा, असे कठोर आदेश योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या आदेशाचे अधिकारीही कठोरपणे पालन करत आहेत. नोएडातील मंदिर असो वा मशिद सगळीकडून लाऊडस्पीकर उतरवले जात आहेत. कानपूरमधील अनेक मशिदीवरून बेकायदा लाऊडस्पीकर हटवले जात आहेत. प्रयागराजपासून पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या बाराबांकी मशिदीच्या मिनारावरून लाऊडस्पीकर उतरवले गेले. या मशिदीमधून मोठ्या आवाजात अजान वाजवली जात असे. उत्तर प्रदेशचे पोलिस आता मशिदीवरून लाऊडस्पीकर उतरवून एकत्र करत आहेत.

फतेहपूरमधील एका मंदिराच्या खांबावरील स्पीकरही उतरवण्यात आला आहे. तसेच, मंदिर आणि मशिदीवर नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले स्पीकरही उतरवण्यात येत आहेत. फिरोजाबादमध्ये पोलिसांनी स्थानिकांना कायदा समजावताच मशीद समितीच्या सदस्यांनीच स्वतःहून लाऊडस्पीकर उतरवले. कौशांबी येथे उत्तर प्रदेशचे पोलिस पोहोचल्यानंतर मंदिरांवरील लाऊडस्पीकरच्या वायरी कापण्यात आल्या.

हे ही वाचा:

नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार

हमासकडून तिसऱ्या टप्प्यात १४ इस्रायली, ३ थाई नागरिकांसह १७ ओलिसांची सुटका!

अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू!

अवकाळी पावसाच्या हजेरीने मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली

अचानक का कारवाई सुरू झाली?

रविवारी मुख्यमंत्री योगी यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक घेतली. तेव्हा लव्ह जिहाद आणि धार्मिक स्थळावर नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या लाऊडस्पीकरचा विषय समोर आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने लाऊडस्पीकर हटवण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले.

Exit mobile version