गुजरात मधील एक महत्त्वाचे शहर असलेल्या बडोद्यामध्ये लाऊड स्पिकर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. मिशन राम सेतू या संस्थेतर्फे हा लाऊड स्पीकर वाटपाच्या कार्यक्रमात पुढाकार घेण्यात आला आहे. बडोद्यातील १०८ मंदिरांना हे लाऊड स्पीकर्स वाटले जाणार आहेत. हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार पासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
बडोदा शहरातील काला घोडा परिसरातील प्रसिद्ध अशा पंचमुखी हनुमान मंदिरातून या लाऊडस्पीकर वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी जसे की बडोद्याचे शहराध्यक्ष डॉक्टर विजय शहा, सरचिटणीस सुनील आणि जसवंत सोळंकी हे देखील उपस्थित होते.
हे ही वाचा:
कोकणातील महापुरात उद्योग गेला वाहून
फेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची ‘जागा’
या कार्यक्रमाविषयी बोलताना मिशन राम सेतूचे अध्यक्ष दीपक अग्रवाल यांनी सांगितले की कोरोना महामारीच्या या कठीण काळात नियमावली आणि निर्बंधांमुळे नागरिकांना मंदिरात येणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत त्यांना घरबसल्या हनुमान चालीसा, आरती आणि इतर सत्संगाचा लाभ घेता यावा म्हणून हा लाऊड स्पीकर वाटपाचा कार्यक्रम करण्यात येत आहे.
यासाठी संस्थेतर्फे नोंदणी प्रक्रिया करण्यात आली. ज्याला शहरातील ७८ मंदिरांनी प्रतिसाद देऊन लाऊड स्पीकर प्राप्त करण्यासाठी नोंदणी केली आहे. यापैकी छोट्या मंदिरांना एक तर मोठ्या मंदिरांना दोन लाऊड स्पीकर देण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी देखील मिशन राम सेतू या संस्थेतर्फे मंदिरांना लाऊड स्पीकर वाटण्यात आल्याचे समजते.