मुंबई मध्ये स्वतःच्या मालकीचं घर घेण्याची इच्छा असणार्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता त्यांच्यासाठी लवकरच जवळपास ३००० घरे उपलब्ध होणार आहेत.
म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, अँटॉप हिलमधील ४५० आणि गोरेगाव पहाडी येथील २६८३ घरांसाठी २०२२ मध्ये सोडत काढण्याचा मुंबई मंडळाचा विचार आहे. तर घरांचा आकडा वाढवण्यासाठी ही मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.
कोविड १९ संकटामुळे म्हाडाची ही लॉटरी लांबणीवर पडली होती. यंदाच्या वर्षी ६५०० घरं ही प्रधानमंत्री आवास योजना, २००० घरं ही मंडळाची तर ५०० घरं इतर काही प्रोजेक्ट्सचा भाग म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत. तर २०२२ मध्ये निश्चितपणे मुंबईतील घरांसाठी सोडत काढण्याच्या दृ-ष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे. अँटॉप हिलमधील ४५० आणि गोरेगाव येथील २६८३ घरांचा यात समावेश असेल. तर आणखी काही घरे वाढविण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
कोर्ट म्हणाले, त्या मुलांची फी परत करा!!
…असा मिळाला सचिनला त्याचा नवा पार्टनर!
वरळी कोळीवाड्याच्या किनाऱ्यालगत सुसज्ज अनधिकृत घरे…
गोरेगाव पहाडी बांगुरनगर येथे मुंबई मंडळाचा मोठा गृहप्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पात अत्यल्प गटातील १९४७ घरे बांधण्यात येत असून ३२० ते ३३० चौ फुटांची ही घरे आहेत. २३ मजली ११ इमारतीत ही घरे असतील. तर अल्प गटातील ७३६ घरांचे काम सुरू असून ही घरे ४८० ते ५९० चौ फुटांची आहेत. २३ मजली चार टॉवरमध्ये ही घरे आहेत.
२०१८ मध्ये १३९५ घरांसाठी १.६४ लाख अर्ज आले होते तर त्यापूर्वी २०१७ मध्येही ८१९ घरांसाठी एक लाखापेक्षा अधिक घरांचे अर्ज आले होते.