जळगावच्या मन्यारखेडा तलावात मृत माशांचा खच!

रसायनयुक्त पाणी तलावात सोडल्याने दुर्घटना, ग्रामस्थांचा संशय

जळगावच्या मन्यारखेडा तलावात मृत माशांचा खच!

जळगाव जिल्ह्यातील मन्यारखेडा तलावातील हजारो माशांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे.तलावात रसायनयुक्त पाणी सोडल्याने ही दुर्घटना घडल्याचा ग्रामस्थांना संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केमिकल कंपन्यांचं सांडपाणी मन्यारखेडा तलावात सोडले जात असल्यामुळे माशांचा मृत्यू झाला आहे.तलावातील तब्बल ५० ते ६० क्विंटल पेक्षा जास्त माशांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्यामुळे मच्छिमारांच्या रोजगाराचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हे ही वाचा..

उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात १० हून अधिक भाविकांचा मृत्यू

ठाण्यातून ठाकरे गटाला धक्का, माजी नगरसेविका मुख्यमंत्री शिंदेच्या गटात सामील!

सिक्कीममध्ये भूस्खलन होऊन १२०० हून अधिक पर्यटक अडकले; नऊ जणांचा मृत्यू

‘जी ७ शिखर परिषदेत सहभागी होऊन पंतप्रधान मोदी मायदेशी परतले’, ‘इटलीचे मानले आभार’!

दरम्यान, दोन वर्षांपूर्वीसुद्धा अशाच पद्धतीचा प्रकार मण्यारखेडा तलावात घडला होता. याबाबत तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या. मात्र प्रदूषण मंडळ अथवा जिल्हा प्रशासनाच्या वतीने याबाबत कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती.आता पुन्हा तशीच एकदा घटना घडली आहे.त्यामुळे आता तरी प्रशासनाने तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

 

Exit mobile version