पावसाळा सुरू होऊन आता महिना लोटला त्यानंतर महापालिकेने आता मुंबईमध्ये अमानुषपणे वृक्षछाटणी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. लाकडे ओंडके भरून ट्रक शहरातून जाताना दिसतात. तेव्हा खऱंच या वृक्षतोडीची आता गरज होती का असाच प्रश्न पडतो. शहराच्या अनेक भागांमधील वृक्षतोड ही नेमकी कुणाच्या वरदहस्तामुळे होत आहे हे मात्र अजूनही कळले नाही.
वृक्षतोड करण्यासाठी आलेल्यांना कुणी बोलावले किंवा वृक्षतोड का करताय यावर नीट उत्तरही दिले जात नाही. मुंबईत बेदरकार वृक्षछाटणी होत असताना पर्यावरणवादी पिता-पुत्र आहेत कुठे? मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटदार झाडं बोडकी करून शेकडो किलो लाकडं गोळा केली जात असताना यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आलीय की, वसुलीसाठी मुंबईतलं हिरवं रान आंदण दिलंय, अशा शब्दांत मुंबई भाजपाने या वृक्षतोडीवर टीका केली आहे.
हे ही वाचा:
१५ जुलैपासून ग्रामीण भागात शाळा सुरु?
मोदी मंत्रिमंडळात ३३ नवे चेहरे, महाराष्ट्रातून ४ नेते मंत्री
अमेरिकेचा काढता पाय आणि अफगाणिस्तानची दैना
अनेक पर्यावरणप्रेमी त्यामुळे या वृक्षतोडीबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसतात. पर्यावरणप्रेमींच्या मते पावसाळ्यानंतर हे काम बरे पालिकेला आठवले. तसेच मुख्य म्हणजे आता गरज नाही अशी झाडेही उगाच पालिकेकडून छाटली जात आहेत. झाडांना छाटण्याची एक योग्य पद्धत असते.
पालिकेकडून अतिशय वाईट पद्धतीने झाडांच्या खोडावरच घाव घातला जात आहे. त्यामुळेच ही झाडे पुढे जगतील की नाही हीच शाश्वती आता राहिली नाही. मुंबईतील अनेक विभागांमध्ये सध्या बिनधास्तपणे वृक्षतोड सुरु झालेली आहे. धडधाकट झाडे तोडताना स्थानिक प्रश्नही विचारतात, पण या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही. त्यामुळेच शहरातील ही वृक्षतोड वखारीतील लाकडांसाठीच सुरू आहे असा अंदाज आता बांधला जात आहे.
मुंबईत बेदरकार वृक्षछाटणी होत असताना पर्यावरणवादी पिता-पुत्र आहेत कुठे? @mybmc चे कंत्राटदार झाडं बोडकी करून शेकडो किलो लाकडं गोळा केली जात असताना यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आलीय की, वसुलीसाठी मुंबईतलं हिरवं रान आंदण दिलंय. @OfficeofUT @AUThackeray #बोगस_पर्यावरणवादी pic.twitter.com/X6ZeOEoyKa
— BJP MUMBAI (@bjp4mumbai) July 7, 2021
मध्यंतरी अंधेरीमधील एका सोसायटीतील झाड तोडण्यासाठी पालिकेकडून आले आहेत असे सांगून अनेक चांगल्या झाडांची कत्तल झाली होती. त्यामुळेच आता हे झाड तोडण्याचे नेमके कारण काय याविषयी नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.