जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोएल म्हणतात, आता तुरुंगातच मेलो तर बरे’!

न्यायालयासमोर हात जोडून गोयल यांनी व्यक्त केल्या भावना

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोएल म्हणतात, आता तुरुंगातच मेलो तर बरे’!

कॅनडा बँकेतील ५३८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोएल यांनी शनिवारी विशेष न्यायालयासमोर हात जोडून विनंती केली. ‘माझ्या सर्व आशा संपल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत जगण्यापेक्षा मी तुरुंगातच मेलेलो बरा,’ अशी विनंती त्यांनी केली आहे. गोयल यांना ईडीने गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी अटक केली होती. सध्या ते मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. यावेळी त्यांनी कर्करोगाशी झुंजत असलेल्या आपल्या पत्नीची खूप आठवण येत असल्याचेही सांगितले.

गोयल यांनी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यांना शनिवारी न्यायालयासमोर सादर करण्यात आले. सुनावणीदरम्यान गोयल यांनी आपल्याला काही मिनिटांसाठी वैयक्तिक बोलायचे आहे, अशी विनंती केली. न्यायाधीशांनी त्यांना त्यासाठी परवानगी दिली. गोयल यांनी हात जोडून त्यांचे संपूर्ण शरीर दुखत असून त्यांची प्रकृती अतिशय ढासळत चालली असल्याचे सांगितले. तसेच, त्यांची पत्नी ही अंथरुळाला खिळली असून त्यांच्या एकुलत्या एका मुलीची प्रकृतीही फारशी ठीक नाही.

तुरुंगातील कर्मचाऱ्यांना आपली मदत करण्यात मर्यादा येत असल्याचेही गोयल यांनी सांगितले. ‘मी त्यांचे म्हणणे धीराने ऐकले असून त्यांनी मांडलेल्या बाबींचे निरीक्षणही केले. त्यांचे संपूर्ण शरीर थरथर कापत असल्याचे मला आढळले आहे. त्यांना उभे राहण्यासाठीही मदतीची आवश्यकता आहे,’ असे न्यायाधीशांनी नमूद केले. गोयल यांनी त्यांचे गुडघ्यांकडेही अंगुलीनिर्देश केला आणि त्यांनी ते सुजल्याचे दाखवले. ते अतिशय दुखत असून ते त्यांच्या पायाची घडीही घालू शकत नाहीत, असे सांगितले.

हे ही वाचा:

बांगलादेशच्या हसीना म्हणतात, भारत हा विश्वासू मित्र!

अयोध्येत जमिनींना चढला भाव; किंमती चारपट वाढल्या

महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ३ बांगलादेशी नागरिकांना अटक!

चेहऱ्यावर हसू अन हातावर ‘श्री राम टॅटू’!

तसेच, लघवी करताना अनेकदा खूप दुखते तसेच, काहीवेळा त्यातून रक्तही जाते. अनेकदा हे दुखणे असह्य होते. बहुतेकदा त्यांना मदतही मिळत नाही,’ असेही गोयल यांनी न्यायाधीशांना सांगितले. ते खूप अशक्त झाले असून आता जे. जे. रुग्णालयात त्यांना दाखवण्यातही काही अर्थ नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तुरुंग कर्मचारी आणि सहाय्यकांच्या मदतीने अन्य कैद्यांसोबत आर्थर रोड तुरंगातून रुग्णालयात जाण्याचा प्रवास खूप खडतर, त्रासदायक असतो आणि तो मी सहन करू शकणार नाही, असेही गोयल म्हणाले. तसेच, रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिथे रुग्णांच्या लांबच लांब रांगा असतात. त्यामुळे डॉक्टरपर्यंत वेळेवर पोहोचू शकत नाहीत आणि जेव्हा जेव्हा डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जाते तेव्हा पुढील पाठपुरावा करणे शक्य नसते, असे गोयल म्हणाले. या सर्वांचा अतिशय विपरित परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे गोयल यांनी सांगितले.

त्यांची पत्नी अनिता ही कर्करोगाशी झुंजत असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. त्यांच्या एकुलत्या एका मुलीची प्रकृतीही ठीक नाही, असे गोयल यांनी सांगितले. तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते. त्यामुळे त्यांनी आपल्याला जे. जे. रुग्णालयात पाठवू नका. त्याऐवजी त्यांना तुरुंगातच मरण्यासाठी खितपत राहू द्यावे,’ अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. ते आता लवकरच ७५ वर्षे पूर्ण करतील. त्यामुळे आता त्यांना कोणतीही आशा राहिलेली नाही. त्यापेक्षा ते तुरुंगातच मेले तर बरे होईल, नशीबच त्यांची सुटका करेल, असेही त्यांनी न्यायालयापुढे सांगितले.

न्यायालयात येण्यासाठीही त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही, मात्र वैयक्तिकरीत्या सर्व गाऱ्हाणे मांडायचे असल्याने ते तुरुंगात आले, असा युक्तिवाद त्यांनी केला. “गोयल यांनी सादर केलेल्या सर्व बाबींची मी दखल घेतली आहे आणि आरोपीला असे आश्वासनही दिले आहे की, त्याला असहाय्य सोडले जाणार नाही आणि योग्य उपचारांसह त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल,’ असे गोयल यांच्या सुनावणीनंतर न्यायाधीशांनी नमूद केले. तसेच, वकिलांनी त्यांच्या प्रकृतीबाबत योग्य ती पावले उचलावीत, असेही निर्देश न्यायाधीशांनी दिले.

Exit mobile version