24 C
Mumbai
Tuesday, January 14, 2025
घरविशेषश्रावणात यंदाही व्यावसायिकांची वणवण

श्रावणात यंदाही व्यावसायिकांची वणवण

Google News Follow

Related

श्रावण येण्यासाठी अवघे काही दिवसच आता शिल्लक राहिले आहेत. एव्हाना सर्वांना श्रावणाचे वेध लागण्याची सुरुवातही झालेली आहे. श्रावण मास हा हिंदु धर्मात पवित्र महिना मानला जातो. मुख्य म्हणजे व्रतवैकल्याच्या या महिन्यात देवी देवतांचे दर्शन घेणेही शुभ मानले जाते. यंदा श्रावण महिना २९ दिवसांचा असल्यामुळे या दिवसांमध्ये तरी मंदिराचे दरवाजे उघडतील की नाही, याकडे आता भाविकांचे लक्ष लागलेले आहे.

मंदिराचे दरवाजे बंद असल्याकारणाने, त्यावर आधारित धंदे आता पूर्णपणे बुडालेले आहेत. देवळे बंद असल्यामुळे भक्तांचा राबताही नाही. कोरोनाच्या कारणामुळे मंदिर प्रवेशावर बंदी आहे. त्यामुळेच आता येत्या ९ तारखेपासून सुरु होणारा श्रावण महिन्यात तरी मंदिरे उघडतील अशी आशा मंदिर परिसरातील दुकानांना आहे. आषाढी वारीवरही ठाकरे सरकारने घातलेल्या बंदीमुळे वारकरी नाराज आहेत. केवळ इतकेच नाही तर, आषाढीच्या अनुषंगाने होणार अर्थकारणही आता पूर्णपणे ठप्प झालेले आहे. राज्यात एकीकडे मद्य दुकाने उघडी मग देवळे बंद का असा सवाल आता भाविकांकडूनच विचारण्यात येत आहे.

हे ही वाचा:

एसटीचा प्रवास डबघाईस; तोटा ५६०० कोटींवर

…पुरावा द्या, नाहीतर ५० कोटींचा दावा ठोकतो!

विकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा

मुसळधार पावसात घरांवर बुलडोझर; नागरिक बेघर

श्रावणकाळात सर्वमंदिरांमध्ये पूजा अर्चा होत असतात. त्यावरच मंदिराच्या बाहेरील मिठाई, हार या दुकानदारांचे आर्थिक गणित अवलंबून असते. अनेकांची गुजराण केवळ याच धंद्यावर होत असल्याने आता धंद्याचे भवितव्य काय असणार आहे याचीच चिंता सर्वांना लागून राहिली आहे. श्रावण महिना यंदा ९ ऑगस्टपासून सुरू होत ६ सप्टेंबरपर्यंत असेल. पण त्या काळात मंदिरे बंद असल्यामुळे कोणताही व्यवसाय करणे शक्य नाही. त्यामुळे मंदिरावर अवलंबून असलेल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उत्पन्न झाला आहे. श्रावणी सोमवारी महादेवाच्या मंदिरात गर्दी होत असते आणि त्याचा लाभ व्यावसायिकांना होत असतो. पण यंदादेखील त्यांचा व्यवसाय बुडणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा