महेश्वरास्त्र, शत्रूला पळो की सळो करून सोडणार

ही एक लांब पल्ल्याची गाइडेड रॉकेट सिस्टिम प्रणाली आहे.

महेश्वरास्त्र, शत्रूला पळो की सळो करून सोडणार

देवाधिदेव भगवान शिव यांच्या शस्त्रास्त्राच्या नावावर आता भारतात रॉकेट प्रणाली बनवली जात आहे. ही एक लांब पल्ल्याची गाइडेड रॉकेट सिस्टिम प्रणाली आहे. याचे नाव महेश्वरास्त्र असे ठेवण्यात आले. भोलेनाथाकडेही असेच शस्त्र होते असा पुराणात उल्लेख आहे. ज्यामध्ये त्याच्याकडे तिसऱ्या डोळ्याची शक्ती होती. आता भारतीय बनावटीच्या रॉकेटला देसी हिमर्स असेही म्हणतात.

सोलार इंडस्ट्रिजच्या माध्यमातून ‘महेश्वरास्त्र’ बनवलं जात आहे. कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी सांगितलं की, ही संकल्पना आम्ही भगवान शिवाच्या अस्त्रावरुन घेतली आहे. याची ताकदही तशीच आहे. ही गाइडेड रॉकेट सिस्टिम आहे. आम्ही याचे दोन व्हर्जन बनवत आहोत. महेश्वरास्त्र – १ आणि महेश्वरास्त्र – २. पहिली श्रेणी १५० किमी आणि दुसरी श्रेणी २९० किमी पर्यंतचा मारा करू शकते.

हे ही वाचा:

बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकणे ही लफंगेगिरीचं

‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’

घाटकोपरला रेस्टोरंटच्या तळमजल्यावर आग, १ ठार

नीरज चोप्राचा आणखी एक विक्रम

दीड वर्षात ते तयार होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. सध्या या प्रकल्पाची किंमत ३०० कोटी रुपये आहे. विकास वेगाने होत आहे. त्याची गती हीच त्याची सर्वात मोठी मारक शक्ती आहे. तसेच हे शस्त्र आवाजाच्या चौपट वेगाने शत्रूवर फेकले जाईल. म्हणजे ताशी ५६८० किलोमीटरचा वेग असून, सुमारे दीड किलोमीटरचे अंतर ते एका सेकंदात पार करेल. तसेच महेश्वरास्त्र-१ ला देसी हिमर्स ही म्हणतात. दुसरी आवृत्ती ब्रह्मोस क्षेपणास्त्र हल्ला असेल. शत्रूला पळून जाण्याची संधीच मिळणार नाही.

Exit mobile version