श्री गणेशाच्या आगमनाने संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. देशात विविध मंडळांकडून विविध देखावे सादर करण्यात आले आहेत. भाविकांच्या गर्दीने रस्ते भरून गेले आहेत. याच दरम्यान, कर्नाटकात प्रभू राम मंदिराच्या थीमवर देखावा सादर करण्यात आला आहे. प्रभू राम मंदिराच्या देखाव्यामुळे भाविक गणेशाचे दर्शन घेत आनंद व्यक्त करत आहेत.
हिंदू महासभेच्या गणपती समितीकडून हा देखावा सादर करण्यात आला आहे. राम मंदिराची कलाकृती उभारण्याचा परिपूर्ण प्रयत्न समितीकडून करण्यात आला आहे. गणेशाच्या दर्शनासाठी आतमध्ये प्रवेश केल्यास आतील बाजूस देशाच्या उभारणीत सहभाग असणाऱ्या शूर वीरांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यंदाची गणेशाची मूर्ती देखील प्रभू राम यांच्या अवतारात आहे. यावेळी भाविकांची गर्दी देखील पाहायला मिळाली.
हे ही वाचा :
‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अटक करा’
अमित शहांसह भाजपाचे प्रमुख नेते लालबागच्या राजाचरणी
समाजवादी पक्षाच्या नेत्याकडून सहाय्यक महिलेचाच बलात्कार !
शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन
हिंदू महासभा गणपती समितीच्या सदस्याने सांगितले की, गणेशाच्या स्थापनेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. दरवर्षी विविध थीमवर आम्ही देखावे उभारतो. यावेळी राम मंदिराचा देखावा आहे. अयोध्यात प्रभू रामाचे मंदिर उभे झाल्याने, आम्ही राम मंदिराचा देखावा उभा केला. राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकांचे प्राण गेले, ५०० वर्षांच्या कालावधीनंतर अयोध्येत राम मंदिर उभे राहिले. हा आंदोस्तव आम्ही देखील या ठिकाणी देखावा करून साजरा केला आहे.