सध्याच्या घडीला अत्यावश्यक कर्मचारी आणि लसीचे दोन डोस घेतलेल्याना लोकलप्रवास मुभा आहे. त्यामुळेच इतरांना रस्तेमार्गाशिवाय ठाण्याबाहेर जाण्यासाठी पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच ठाणे स्टेशन परीसरामध्ये सध्याच्या घडीला लांबच लांब रांगा आपल्याला लागलेल्या दिसत आहेत.
वाहतूक कोंडीचा फटका टीएमटीलाही मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांना केवळ ताटकळत उभे राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ठाण्यातल्या ठाण्यातच प्रवास करण्यासाठी प्रवासी आता ताटकळत उभे राहताना दिसत आहेत.
घोडबंदर रोड, तीन हात नाका, नितीन कंपनी अशा शहरातील विविध भागांमध्ये खड्डे सर्वत्र पडले आहेत. त्यामुळेही प्रवास करणे अगदी जिकीरीचे होऊन बसलेले आहे. तसेच वाहतूक विभाग व परिवहन विभागाच्या नियोजनाअभावी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर जागोजागी खोदकाम होत असल्याने पादचार्यांना चालण्यासाठी मोकळा रस्ता उपलब्ध होत नसून याला संबंधित सुस्त यंत्रणा कारणीभूत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणातही वाढ होत असून आरोग्याचा प्रश्न देखील आ वासून उभा आहे.
हे ही वाचा:
नितीन गडकरी यांनी केले महाराष्ट्रातील २२ महामार्गांचे भूमिपूजन
४ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये होणार किलबिलाट
‘केंद्र सरकारने जे केले ते कोणताही देश करू शकत नाही’
ऑस्ट्रेलिया, जपान सोबतची दोस्ती तुटायची नाय
ठाणे शहरामध्ये सध्याच्या घडीला २३० ते २४० बस गाड्या विविध मार्गांवर धावत आहेत. लोकमान्य नगर, वृंदावन सोसायटी, पवारनगर या भागांमध्ये जाणारे संख्येने खूप असल्यामुळे सॅटीसवरीला लांबच लांब लागलेल्या रांगा आपले लक्ष सध्या वेधून घेत आहेत. त्यातच अर्ध्या बस फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे फेरी रद्द करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. ठाण्यातील वाहतुकीची जटिल समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. त्यातील बहुसंख्य प्रकल्प रखडले किंवा फक्त कागदावरच राहिले.