लंडन सिंगापूर विमान अचानक ६ हजार फूट खाली आले, एकाचा मृत्यू

लंडन सिंगापूर विमान अचानक ६ हजार फूट खाली आले, एकाचा मृत्यू

वादळी हवामानामुळे सिंगापूर एअरलाइन्सच्या लंडन-सिंगापूर विमानप्रवासात तीव्र अडथळा आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या विमानाला काही मिनिटांसाठी अडथळा आला. त्यानंतर हे विमान बँकॉकला रवाना करण्यात आले. तिथे आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी जखमी प्रवाशांवर उपचार केले.

बोइंग ७७७-३००० ईआर हे विमान २११ प्रवाशांसह आणि १८ क्रू सह मंगळवारी दुपारी तीन वाजून ४५ मिनिटांनी बँकॉकला उतरले, असे एअरलाइनने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे. सिंगापूर एअरलाइन्सचे हे विमान ३७ हजार फुटांवरून उडत होते. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत ते ३१ हजार फुटांवर आले. ते सुमारे १० मिनिटे ३१ हजार फुटांवर उडत होते. त्यानंतर अर्ध्या तासाने ते बँकॉकला उतरवण्यात आले. म्यानमारजवळ येत असताना अंदमान समुद्रात ही घटना घडली.

हे ही वाचा:

धोनी मुख्य प्रशिक्षकासाठी स्टीफन फ्लेमिंगचे मन वळविणार?

आधी ‘लेडी सिंघम’ होते, आता भाजपाची एजंट? स्वाती मालीवाल यांचा सवाल

सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ

इंडी आघाडी देशाचे विभाजन करणारी, ते देशाला पुढे काय नेणार?

बँकॉकमधील सुवर्णभूमी विमानतळापासून २० किमी असणाऱ्या समितीवेज श्रीनाकारिन रुग्णालयात आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी या जखमींना तातडीने रुग्णवाहिकेत नेण्यासाठी धाव घेतली. या तीव्र अडथळ्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ‘सिंगापूर एअरलाइन्स मृत व्यक्तीच्या कुटुंबाप्रती तीव्र शोक व्यक्त करते,’ असे एअरलाइनने म्हटले आहे. ‘आम्ही आवश्यक वैद्यकीय मदत देण्यासाठी थायलंडमधील स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत आणि अतिरिक्त सहाय्य देण्यासाठी बँकॉकला एक पथक पाठवत आहोत,’ असेही त्यांनी नमूद केले आहे.

Exit mobile version