‘लोकशाही’ चॅनेलवर ७२ तासांची बंदी

किरीट सोमय्या व्हीडिओ प्रकरण

‘लोकशाही’ चॅनेलवर ७२ तासांची बंदी

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे खासगी व्हीडिओ दाखविणाऱ्या लोकशाही या वृत्तवाहिनीवर ७२ तासांची बंदी घालण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. वाहिन्यांसाठी असलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई आहे.

 

 

जुलै महिन्यात हे व्हीडिओ या चॅनेलवर दाखविण्यात आले. त्यातून किरीट सोमय्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने पत्रक काढले असून या वाहिनीवर ही बंदी घातली गेल्याचे म्हटले आहे. कार्यक्रमाच्या संहितेचा भंग केल्याबद्दल ही कारवाई चॅनेलवर निर्धारित तासांपुरती करण्यात आल्याचे म्हटले आहे.

 

 

या पत्रकात म्हटले आहे की, लोकशाही मराठी टीव्ही चॅनेल हे भारतातील कोणत्याही मंचावरून ७२ तासांसाठी हटविण्यात आले आहे. २२ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजल्यापासून ही कारवाई सुरू होईल. २५ सप्टेंबर २०२३पर्यंत ही कारवाई सुरू राहील.

हे ही वाचा:

दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बिधुरी यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस !

लाइनमध्ये सतरा तास उभे राहून आयफोन १५ खरेदी!

सनातन धर्मावर टिप्पणी केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिनला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस !

दहशतवादी, गुन्हेगारांबद्दल केंद्र सरकारची टीव्ही वृत्तवाहिन्यांना सूचना

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे उपसंचालक प्रतीक जैन यांच्या सहीने हे पत्र लोकशाहीच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठविण्यात आले आहे.

Exit mobile version