लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर ओम बिर्ला यांनी जिंकली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार ओम बिर्ला यांनी काँग्रेसचे के सुरेश यांचा पराभव केला आहे. ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
लोकसभेच्या सभापतीपदासाठी आज सकाळी निवडणूक पार पडली. यावेळी एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडी आघाडीकडून के सुरेश निवडणुकीच्या मैदानात होते. काल (२५ जून) दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर संसदेत आज आवाजी मतदान पार पडेल. यामध्ये ओम बिर्ला यांच्या नावाला तब्बल १३ पक्षांनी समर्थन दर्शवले. आवाजी मतदानाच्या आधारे ओम बिर्ला यांनी ही निवडणूक जिंकली आहे तर के सुरेश यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले आहे.
हे ही वाचा:
पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या असदुद्दीन ओवेसींची खासदारकी रद्द करण्याची मागणी
रेल्वेसंबंधी व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणारे
पवार, ठाकरे, जरांगेंचे गलिच्छ राजकारण चालू देणार नाही!
गावबंदीची उठाठेव कशाला? ओबीसींचे आंदोलन ‘जरांगे’ मार्गाने जायला नको…
ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी संपूर्ण सभागृहाचे अभिनंदन करतो. येत्या पाच वर्षात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल असा विश्वास आम्हा सर्वांना असल्यचे त्यांनी सांगितले.