हिवाळी अधिवेशनात व्यत्ययामुळे लोकसभेचे ७० तास वाया!

एकट्या तिसऱ्या सत्रात ६५ तास वाया

हिवाळी अधिवेशनात व्यत्ययामुळे लोकसभेचे ७० तास वाया!

संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान वारंवार व्यत्यय आणला गेला. मिडिया रिपोर्ट्सनुसार, एकट्या तिसऱ्या सत्रात संसदेचा कारभार ६५ तासांसाठी तहकूब करण्यात आला. तसेच एकूण हिवाळी अधिवेशनाच्या तीनही सत्रांचा विचार केला असता ७० तासांपेक्षा जास्त वेळा वाया गेला.

रिपोर्ट्सनुसार, २५ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या संसदेच्या पहिल्या सत्रात विरोधकांनी अदानी मुद्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे पहिल्या सत्रात संसदेचा एकूण ५ तास ३७ मिनिटे वेळ वाया गेला. अशाच प्रकारे १९ डिसेंबर रोजी काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुद्यावर भांडणे उकरली. मुद्दा संसदेत हाणामारीपर्यंत गेला. खासदारांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर संसद स्थगित करण्यात आले, त्यात पुन्हा ६५ तास १५ मिनिटांचे नुकसान झाले.

माहितीनुसार, अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात ७ बैठका, दुसऱ्या टप्प्यात १५ बैठका, तर तिसऱ्या टप्प्यात २० बैठका झाल्या. विरोधकांनी प्रचंड आव्हाने निर्माण केल्यानंतरही सत्ता पक्षाच्या खासदारांनी प्रलंबित अजेंडा संबोधित केला. अनेकदा अजेंडा पूर्ण करण्यासाठी बैठकाही वाढवल्या. एका अहवालानुसार, पहिल्या सत्रात खासदारांनी एकूण ७ तास उशिरापर्यंत काम केले. तर दुसऱ्या सत्रात ३३ तास अतिरिक्त काम केले.

विरोधकांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून गदारोळ केला. यात वाया गेलेल्या वेळेची भरपाई करण्याच्या प्रयत्नात सभागृहाचे कामकाज  तासांपर्यंत वाढवण्यात आले. दरम्यान, पहिल्या सत्रात सरकारने कोणतेही विधेयक मांडले नाहीत. दुसऱ्या सत्रात १२ विधेयके मांडण्यात आली, यापैकी ४ लोकसभेत मंजूर झाली. तिसऱ्या सत्रात सरकारने ५ विधेयके मांडली, यापैकी ४ मंजूर झाली.

हे ही वाचा  : 

कल्याण मारहाण प्रकरण; अखिलेश शुक्लाने मांडली व्हिडिओतून बाजू!

संकटकाळात काय करायचं हे बोट चालकाने सांगितलं नाही!

काठमांडू ते दुबई ‘हाता’चे जाळे उद्ध्वस्त करण्याचा शंखनाद…

सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घरावर बुलडोजर, पायऱ्या तोडल्या!

 

Exit mobile version