२१ राज्यांतील १०२ जागांवरील प्रचार थंडावला!

१६२५ उमेदवारांचे नशीब मतदार ठरवणार

२१ राज्यांतील १०२ जागांवरील प्रचार थंडावला!

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यांत २१ राज्यांमधील १०२ जागांवर शुक्रवार, १९ एप्रिल रोजी निवडणुका होत आहेत. त्यात आठ केंद्री मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री, एका माजी राज्यपालांसह १६२५ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार थंडावला. आता पुढील ३६ तास उमेदवार घराघरांत जाऊन प्रचार करतील. या दरम्यान चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी जाहीर होईल. चौथ्या टप्प्यांत १० राज्यांतील ९६ जागांवर १३ मे रोजी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १३ व जम्मू काश्मीरमधील एका जागेवरही मतदान होईल.

शुक्रवारी सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल. पहिल्या टप्प्यात तमिळनाडूतील सर्व ३९, राजस्थानमधील १२, उत्तर प्रदेशातील आठ, उत्तराखंडमधील सर्व पाच, अरुणाचल प्रदेशातील दोन, बिहारमधील चार, छत्तीसगडमधील एक, आसाममधील चार, मध्य प्रदेशातील सहा, महाराष्ट्रातील पाच, मणिपूरमधील दोन, मेघालयमधील दोन, मिझोरम त्रिपुरामधील प्रत्येकी एक, पश्चिम बंगालमधील तीन जागांवर मतदान होईल, जम्मू काश्मीर, अंदमान निकोबार, लक्षद्वीप आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी एका जागेवरही मतदान होईल.

हे ही वाचा:

रवी किशनची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेविरुद्ध पत्नी प्रीती शुक्ला यांची तक्रार!

गुजरातला नमवून दिल्ली विजेते!

भाजपाशासित राज्यांमधून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधी संकोच का करतायत?

रामनवमीच्या दिवशी ‘जय श्री रामा’चा नारा दिल्याने बेंगळुरूमध्ये तीन जणांवर प्राणघातक हल्ला

गडकरी, सोनेवाल, बलियान यांच्या नशिबाचा फैसला
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी नागपूर जागेवरून हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत.अरुणाचल पश्चिम मतदारसंघातून केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू चौथ्यांदा जिंकण्याचा प्रयत्न करतील.डिब्रूगडमधून जहाज मंत्री सर्बानंद सोनोवाल, मुझफ्फरनगरमधून संजीव बालियान, उधमपूरमधून जितेंद्र सिंह, अलवरमधून भूपेंद्र यादव, बिकानेरमधून अर्जुनराम मेघवाल आणि नीलगिरीमधून एल मुरुगन मैदानात आहेत.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत हरिद्वार व त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव देव पश्चिम त्रिपुरामधून मैदानात आहेत.तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई कोइम्बतूर मतदारसंघातून मैदानात उतरतील.माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ति हे शिवगंगा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवतील.निवडणुकीआधी राज्यपालपदाचा राजीनामा दिलेले तमिलिसाई सुंदरराजन चेन्नई दक्षिणमधून भाजपचे उमेदवार असतील.

Exit mobile version