लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या म्हणजेच शनिवारी(१६मार्च) जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग उद्या म्हणजेच शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक उद्या जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने ट्विटरवर पोस्ट करत दिली आहे.
निवडणूक आयोगाने ट्विटरवर पोस्ट करत सांगितले की, ‘लोकसभा निवडणुका- २०२४ आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून उद्या १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते थेट प्रक्षेपित केले जाईल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
तिकीट नाकारल्याने तृणमूलच्या नेत्यांनी ममतांचे फोटो उतरवले, मोदींचे फोटो लावले!
सर्वेक्षणानुसार एनडीए ४०० पार करणार!
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल
मुंबईतील रस्ते कामाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका!
निवडणूक आयोगाच्या ट्विटनंतर उद्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच देशभरात अचारसंहीता लागू होणार होईल.
दरम्यान, सूत्रांचे म्हणणे आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुका ७-८ टप्प्यात होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून निवडणूक आयोगानेही त्याचा आढावा पूर्ण केला आहे.सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत असून त्याआधी नवीन सभागृह स्थापन करावे लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीची घोषणा १० मार्च रोजी झाली आणि ११ एप्रिलपासून सात टप्प्यात मतदान झाले आंणि २३ मे रोजी मतमोजणी झाली.