निवडणूक आयोग १३ मार्चनंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोग अनेक राज्यांना भेटी देत आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर तारखा जाहीर केल्या जातील, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. केंद्रीय निवडणूक मंडळाचे अधिकारी सध्या तामिळनाडूला भेट देत आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरला भेट दिली जाईल. १३ मार्चपूर्वी सर्व राज्यांचे दौरे पूर्ण होणार आहेत.
आयोगाकडून गेल्या काही महिन्यांपासून तयारीचा अंदाज घेण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) नियमित बैठका घेत आहे. सीईओंनी समस्या क्षेत्रे, ईव्हीएमची हालचाल, त्यांची सुरक्षा दलांची आवश्यकता या सर्व गोष्टी सूचीबद्ध केल्या आहेत, विशेष म्हणजे, निवडणूक आयोग यावर्षी निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरण्याची योजना आखत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने मे महिन्यापूर्वी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मुक्त आणि निष्पक्षतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा..
खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती अशक्य
तृणमूलचा फरार नेता शाहजहां शेख याला ईडीकडून चौथे समन्स!
दाऊद इब्राहिमच्या भावाच्या मेहुण्याची उत्तर प्रदेशात हत्या!
युक्रेन-रशिया संघर्षापासून दूर राहा
सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती काढून टाकण्यासाठी इसीआयमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी एक समर्पित विभाग तयार करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावरील खोट्या आणि प्रक्षोभक मजकूर काढून टाकणे जलद गतीने केले जाईल आणि कोणत्याही पक्षाने किंवा उमेदवाराने नियमांचे उल्लंघन केल्यास आयोग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना खाती गोठवण्यास सांगण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत ९६.८८ कोटी लोक मतदान करण्यास पात्र आहेत. याव्यतिरिक्त १८-१९ वयोगटातील १.८५ कोटी लोकांनी मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.