मणिपूरमधील ११ बूथवर पुन्हा मतदान!

पहिल्या टप्प्यातील हिंसाचारामुळे निवडणूक आयोगाने घेतला होता निर्णय

मणिपूरमधील ११ बूथवर पुन्हा मतदान!

लोकसभा मतदारसंघातील ११ मतदान केंद्रांवर सोमवारी (२२ एप्रिल) पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. मतदानादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने ११ बूथवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले होते.

लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा टप्पा १९ एप्रिल रोजी देशभर पार पडला.मात्र, मणिपूरमध्ये काही अज्ञातांनी गोळीबार केल्याने राज्यात अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान झालेच नाही.१९ एप्रिल रोजी काही बदमाशांनी मतदान केंद्रांवर गोळीबार करत ईव्हीएमची नासधूस केली.यानंतर निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी हिंसाचार झाला अशा ११ बूथवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले.या आदेशानंतर आज पुन्हा मतदानाला सुरुवात झाली आहे.

हे ही वाचा:

इराकमधून सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर पाच रॉकेट डागले!

न्यूज २४ चा माधवी लता यांच्याबाबत खोडसाळपणा, पोस्ट हटवली!

सांगलीतून विशाल पाटील लोकसभा अपक्ष लढणार?

न्यूझीलंडने तिसऱ्या टी-२० मध्ये पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवला

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. “आम्ही मतदान करण्यासाठी आलो आहोत. येथे पुन्हा मतदान सुरू आहे. सुरक्षा वाढवण्यात आली आहे,” असे एका स्थानिकाने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

ज्या मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येणार आहे त्यामध्ये खुरई मतदारसंघातील मोइरांगकंपू साझेब आणि थोंगम लिकाई, छेत्रीगावमधील चार, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील थोंगजूमधील एक, उरीपोकमधील तीन आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कोंथौजममधील एका मतदान केंद्राचा समावेश आहे.दरम्यान, १९ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबारात एक नागरिक जखमी झाला होता.

 

Exit mobile version