गावचा रस्ता लव्हलिनाची वाट पाहतोय

गावचा रस्ता लव्हलिनाची वाट पाहतोय

भारतीय महिला लवलीना बोरगोहेनने टोक्यो ओलिम्पिकमध्ये सेमीफायनलपर्यंत धडक घेतली आहे. बॉक्सिंगच्या नियमांनुसार लवलीनाने किमान कांस्य पदक पक्कं केलं असून तिच्या या यशामुळे सर्व भारतवासियांना तिच्यावर गर्व आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी लवलीना तिसरी बॉक्सर बनणार आहे. तिच्या या यशाचं कौतुक करत आसाम राज्य सरकारने तिला एक अनोखं गिफ्ट दिलं आहे. सरकारने लवलीनाचं गाव बारोमुखियामध्ये ३.५ किलोमीटरचा पक्का रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. लवलीनाचं हे गाव आसमच्या गोलाघाटमध्ये आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, राज्य सरकार लवलीनाची टोक्योवरुन घरी परतण्याची वाट पाहत आहे. सरकारने या रस्त्याचे काम चालू केले असून ती येण्यापूर्वी या रस्त्याच काम पूर्ण करण्याचा सरकारचा निश्चय आहे. यासाठी  ओवरटाइमवर काम केले जात आहे. आतापर्यंत त्याठिकाणी साधा रस्ता असल्याने गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

याआधीही संबधित रस्ता बनवण्यासाठी काही प्रयत्न केले गेले होते मात्र रस्त्याचे काम पूर्ण झाले नव्हते. पण आता लवलीनाच्या पदकाने या कामाला संपूर्ण जोमात सुरु करवले आहे. २०१६ मध्ये आसमचे तत्कालीन मुख्यमंत्री सर्वानंद सोनेवाल यांनी हे काम सुरु केलं होतं. पण केवळ १०० मीटर रोडचा काम पू्र्ण झालं. या ठिकाणी ३/९ गोरखा राइफचे हवलदार पदम बहादुर श्रेष्टा यांचही घर आहे. ज्यांनी २०१९ मध्ये पाकिस्तानद्वारा झालेल्या फायरिंगमध्ये जीव गमावला होता. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार लवलीनाच्या गावात पाण्याचा पुरवठाही ठिक नसून पाणी ट्यूबवेल किंवा तलावातून येतं. गावांत मोठं रुग्णालय नसल्याने गंभीर रुग्णाला ४५ किलोमीटर दूर घेऊन जावं लागतं.

हे ही वाचा:

दगडफेक करणाऱ्या दहशतवाद्यांना दणका

‘तो’ विषय आमच्यासाठी संपलेला आहे

नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट,नो पेट्रोल’

पूर्व आशियात कोरोनाची तिसरी लाट, भारतालाही धोका?

सेमीफायनलपर्यंत पोहोचल्यानंतर आता लवलीना किमान कांस्य पदकाची हकदार झाली असली तरी तिला सुवर्णपदकाची अपेक्षा  आहे. आता सेमीफायनलचा लवलीनाचा सामना टर्कीची बॉक्सर बी. सुरमेनली हिच्याशी असेल. हा सामना ४ ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार ११ वाजता सुरु होईल.

Exit mobile version