२ एप्रिलला पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय?

२ एप्रिलला पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय?

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्यातील वाढता कोरोना याबद्दलची चर्चा करण्यात आली. पुण्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पण ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

“मी सर्वांशी चर्चा केली आहे. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर २ एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल. जनतेच्या मनात भीती राहिलेली नाही. मी याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोललो आहे. सगळे निर्णय एकमताने घेतले आहेत. पुण्यात लसीकरणाचा वेग वाढवणार आहोत. पुण्यात ५० टक्के बेड्स राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी कार्यक्रम सर्वच पक्षांनी बंद केले पाहिजेत. लग्न किंवा अंत्यसंस्कारावेळी ५० पेक्षा जास्त संख्या नको,” अशी सूचना अजित पवारांनी केली आहे.

हे ही वाचा:

पटोले, दलवाईंनंतर सातवही राऊतांच्या विरोधात, काँग्रेस नेते सेनेवर नाराज?

संजय राऊतांचे युपीए २ चे इमले

संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का?- नाना पटोले

निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत

पुण्यात सध्या तरी लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. पण कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुण्यात रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे. या नियमांचे पालन केले नाही तर २ एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल, असेही अजित पवार म्हणाले.

Exit mobile version