कोल्हापुरात १५ मे पर्यंत लॉकडाऊन

कोल्हापुरात १५ मे पर्यंत लॉकडाऊन

कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उद्यापासून पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी  पॉझिटिव्ह दर कमी नाही. सध्या जिल्ह्यातील २४०० रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात आहे. त्यामुळे उद्या बुधवार, ५ मे सकाळी ११ पासून पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यानुसार १५ मे पर्यंत कोल्हापुरात लॉकडाऊन असणार आहे.

हे ही वाचा:

देशभरात कोरोना रुग्णवाढीत घट

देशव्यापी लॉकडाऊन करा

आयपीएल २०२१ कोरोनामुळे रद्द

लक्षात ठेवा, टीएमसीचे खासदार, मुख्यमंत्री दिल्लीतसुद्धा येतात- प्रवेश सिंह वर्मा

कोल्हापूर जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या पाहता प्राणवायू आणि रेमडेसिव्हीरची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी १० वाजता दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते.

Exit mobile version