कौतुकास्पद… लॉकडाउनमध्ये रेल्वेने केली युद्धपातळीवर पुलांची बांधणी

कौतुकास्पद…  लॉकडाउनमध्ये रेल्वेने केली युद्धपातळीवर पुलांची बांधणी

‘लॉक डाउन मधील रेल्वे सेवा बंद किंवा तुरळक असल्याचा फायदा घेऊन मध्य व पश्चिम रेल्वेने ११ नवीन पादचारी पूल बनवले तर ३० पुलांची डागडुजी केली. जेणेकरून अपघाताचे प्रमाण जवळपास शून्यवत झाले आहे. या समयसुचकतेबद्दल रेल्वे मंत्रालयाचे व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे हार्दिक अभिनंदन, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी रेल्वेच्या या कामाचे कौतुक केले आहे.

हे ही वाचा:

मोदींविरोधी पोस्टर्ससाठी ‘आप’ने हाताशी धरले रिक्षावाल्यांना

…आणि केंद्राच्या मदतीमुळे तळोज्यातील ऑक्सिजन प्लँटला मिळाला स्पेअरपार्ट!

इस्रायलने का केला मीडिया इमारतीवर हल्ला?

नक्की कोण खरं? सरकारी वकील की काँग्रेस?…भाजपाचा सवाल

गेल्या वर्षी मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनचा अचूक फायदा रेल्वेने उचलला. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी रेल्वेने कंबर कसली. रेल्वेने अनेक उपाययोजना करत रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्यांना रोखण्यात यश मिळविले त्यामुळे प्रवशांचा मृत्यू आणि जखमींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली.

पश्चिम आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल हे या सगळ्या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी काय करता येईल याचीही पाहणी कंसल यांच्या देखरेखीखाली होत आहे.

२०२०-२१ या आर्थिक वर्षात ११ पादचारी पूल उभारण्यात आले तर ३० पुलांची डागडुजी करण्यात आली. पश्चिम रेल्वेवर २६ पादचारी पूल, ४७ चालते जिने आणि ५४ उद्वाहने बसविण्यात आली. ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांसाठी पाच चालते जिने बसविण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेने आपल्या उपनगरी भागात ज्याठिकाणी अपघातांची संख्या जास्त आहे, अशी ७३ ठिकाणे निश्चित केली असून त्यापैकी ५९ जागा या प्रवाशांसाठी बंद केल्या आहेत. इतर ठिकाणीही ती प्रक्रिया सुरू आहे.

Exit mobile version