जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज मध्यरात्री पासून पुढील दहा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे. या लॉकडाऊनला परळीमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून व्यापाऱ्यांनी बाजार पेठा कडकडीत बंद ठेवल्या आहेत. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, वैद्यनाथ मंदिर हे नेहमी गजबाजणारे ठिकाण निर्मनुष्य झाले आहेत.
शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कसून चौकशी केली जातेय. जिल्ह्यात दररोज कोरोना ग्रस्तांचा आकडा हजारांची संख्या ओलांडत आहे, त्यामुळे जिल्हाधिका- यांनी कडक लॉकडाऊन लावला आहे. या मध्ये वैद्यकीय सेवा आणि सकाळी ७ ते ११ यावेळेत दूध विक्रीस परवानगी असून इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर परळीत काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे.
बीड जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन १२ मे रात्री १२ पासून ते १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. नागरिकांना बाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवल्या जातील. भाजीपाला विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ ची वेळ.
हे ही वाचा:
आता बँक बुडाली तरी ठेवीदारांना चिंता नाही, मोदी सरकारचा नवा नियम
ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला
मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक
अतुल्य भारताचा सन्मान करा, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने मीडियाला सुनावले
सकाळी १० ते १२ दरम्यान बँकेचे व्यवहार सुरु राहतील, असे नियम लागू करण्यात आले होते. हेच नियम पुढील दहा दिवसांसाठी लागू असतील. सकाळी ठराविक वेळेत फिरत्या भाजीपाला विक्रीला परवानगी आहे. बँक सकाळी १० ते १२ पर्यंत सुरू असतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कडकडीत बंद राहील. बीडमध्ये शनिवारी ११०२ कोरोना रुग्ण आढळले होते.