सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरली!

हार्बर मार्गावर चाचणी दरम्यान घडली घटना

सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरली!

सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा रुळावरून घसरला आहे.हार्बर मार्गावर चाचणी दरम्यान लोकलचा डबा घसरला आहे.विशेष म्हणजे या मार्गावर तीन दिवसांपूर्वीच लोकलचा डबा घसरला होता.त्यानंतर आज चाचणी घेत असताना या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना मध्य रेल्वेच्या सीपीआरओ(CPRO) स्वप्नील नीला म्हणाले की, मागील तीन दिवसांपूर्वी याच मार्गावर लोकलचा डबा घसरला होता.पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी या मार्गावर चाचणी घेण्यात आली.संपूर्ण लोकल रिकामी होती.परंतु, या मार्गावर जे काम झाले होते त्यातील काही दोष निघू न शकल्यामुळे ही घटना घडली.ही एक चाचणी होती.या मार्गावरील काही काम रात्री आणि काही काम सकाळी करण्यात आले होते.रात्रीच्या वेळेत चाचणी करता येत नाही म्हणून सकाळी याची चाचणी करण्यात आली.सकाळी चाचणी केल्याने मार्गावरील त्रुटी समोर दिसून येतात, असे स्वप्नील नीला म्हणाले.

हे ही वाचा:

सिद्धू मूसवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या?

कोव्हीशिल्ड लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची चर्चा, पण तथ्य नाही

टीएमसीला मतदान करण्यापेक्षा भाजपला करा!

‘आरक्षण ना कधी काढले गेले ना कधी काढले जाणार’

दरम्यान, लोकल पुन्हा त्याच ठिकाणी घसरल्यामुळे पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वडाळा ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. जोपर्यंत ही घसरलेली रिकामी लोकल पुन्हा एकदा रुळांवर आणत नाही तोपर्यंत वाहतूक बंद असेल, असंही रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे.

Exit mobile version