सरन्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीदिवशी सर्वोच्च न्यायालयात लाईव्ह स्ट्रीमिंग

रमण्णा हे निवृत्त होत असताना सुनावणीदरम्यान पहिल्यांदाच लाईव्ह स्ट्रीमिंग होत आहे.

सरन्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीदिवशी सर्वोच्च न्यायालयात लाईव्ह स्ट्रीमिंग

भारताचे मुख्य सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा हे आज, २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. रमण्णा हे निवृत्त होत असताना सुनावणीदरम्यान पहिल्यांदाच लाईव्ह स्ट्रीमिंग होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार, आज सकाळी १०.३० वाजल्यापासून सरन्यायाधीशांच्या न्यायालयाची किंवा औपचारिक खंडपीठाची कार्यवाही NIC (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर) वेबकास्ट पोर्टलद्वारे थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.

फ्रीबी प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आज थेट प्रक्षेपित होणार असून सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील सेरेमोनिअल बेंचसमोर खटले चालवले जाणार आहेत. तसेच २० प्रकरणांचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस असून शेवटचा दिवस साजरा करण्यासाठी हे केले जात असल्याची माहिती आहे.

आतापर्यंत सर्वात जास्त न्यायाधीशांची नेमणूक करणाऱ्या सरन्यायाधिशांच्या यादीत रमण्णांचा क्रमांक पहिला आहे. त्यांनी एक वर्षाहून कमी कालावधीत १०० पेक्षा जास्त न्यायाधिशांची नेमणूक उच्च न्यायालयात आणि पाचपेक्षा जास्त न्यायाधीशांची नेमणूक सर्वोच्च न्यायालयात केलेली आहे. त्यामुळे आता निवृत्त होत असताना त्यांनी न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबतचा एक मोठा विक्रम त्यांच्या नावावर केला आहे.

हे ही वाचा:

भारतात लवकरच होणार 6G लाँच

अनिल अंबानी यांनी ८१४ कोटी रुपये लपवले

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

एन. व्ही. रमण्णा यांची १७ फेब्रुवारी २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली होती. त्यांनी देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ २४ एप्रिल २०२१ रोजी घेतली होती. परंपरेनुसार, एन व्ही रमण्णा त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी देशाच्या पुढील सरन्यायाधीशांसोबत बेंच शेअर करणार आहेत. रमण्णा यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी औपचारिक खंडपीठासमोर त्यांचा निरोप समारंभ पार पडेल.

Exit mobile version