झारखंडमध्ये लिव्ह-इन पार्टनरची हत्या

मृतदेहाचे ५० तुकडे तुकडे केले

झारखंडमध्ये लिव्ह-इन पार्टनरची हत्या

Shadow of the hand holding a knife on wall background

झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात एका २५ वर्षीय कसायाला त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून तिच्या शरीराचे ५० तुकडे केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ही घटना घडली. २४ नोव्हेंबर रोजी जंगलाच्या परिसरात मानवी अवशेषांसह एक भटका कुत्रा दिसल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

नरेश भेंगरा असे आरोपीचे नाव असून यातील पीडित तरुणीचे नाव गंगी कुमारी असे आहे. ते जोर्डाग गावचे रहिवासी होते. परंतु ते तामिळनाडूमध्ये राहत होते आणि काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे गेल्या काही वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र पीडितेच्या नकळत नरेशने खुंटी येथील दुसऱ्या महिलेशी लग्न केले. तो तामिळनाडूला परतला आणि गंगीसोबत राहायला लागला.

हेही वाचा..

एअर इंडियाच्या महिला वैमानिकाची आत्महत्या

मानवी तस्करी प्रकरणी एनआयएकडून सहा राज्यांमध्ये २२ ठिकाणी छापेमारी

दिल्लीत ईडीच्या पथकावर हल्ला, एक अधिकारी जखमी

व्यवसायाबाबत बोला; काश्मीर मुद्द्यावर बोलण्यासाठी आलेलो नाही!

ही घटना ८ नोव्हेंबर रोजी घडली. तेव्हा गंगीच्या सांगण्यावरून हे जोडपे खुंटी येथे परतले. मात्र, तिने त्याला गावी नेण्यास भाग पाडले आणि त्याने नकार दिल्यास त्याचे पैसे परत करण्यास सांगितले तेव्हा दोघांमध्ये भांडण झाले. त्याऐवजी भेंगडा तिला त्याच्या घराजवळील जंगलात घेऊन गेला आणि तिच्या दुपट्ट्याने गंगीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने मृतदेहाचे सुमारे ५० तुकडे करून ते फेकून दिले.

पोलिसांना जंगलात एक पिशवी देखील सापडली ज्यात गंगीचे सामान होते. त्यात तिचे आधार कार्ड आणि फोटो होता. ज्याची नंतर तिच्या आईने ओळख पटवली. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये रक्ताने माखलेला विळा आणि कुदळ देखील होती. भेंगरा याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशीत त्याने पीडितेचा खून केल्याची कबुली दिली.

खुंटी येथील एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला अटक करण्यात आल्याची पुष्टी केली आणि त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. ही ताजी घटना २०२२ मधील श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणाची आठवण करून देणारी आहे. तिची दिल्लीत तिच्या लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने हत्या केली होती.

आफताबने १८ मे २०२२ रोजी श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी जवळपास तीन आठवडे ३०० लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले होते, त्यानंतर अनेक दिवस ते संपूर्ण शहरात टाकले होते. त्याच वर्षी १२ नोव्हेंबरला त्याला अटक करण्यात आली होती.

Exit mobile version