मुख्यमंत्री केजरीवालांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ !

मनीष सिसोदिया आणि के.कविता यांच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ

मुख्यमंत्री केजरीवालांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ !

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होत नाहीत. दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ८ ऑगस्टला होणार आहे. तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केजरीवाल यांची हजेरी झाली. सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगातूनच अटक केली होती.

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याशिवाय माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेते के कविता हेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले. राऊस अव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी ३१ जुलैपर्यंत आणि के. कविता यांची न्यायालयीन कोठडी ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; खनिजांवरील ‘रॉयल्टी’ हा कर मानला जाऊ शकत नाही

विधानसभेला मनसे २५० जागा लढवणार

कोल्हापुरात पंचगंगेचा रेड अलर्ट !

राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी यापूर्वी १२ जुलै रोजी सुनावली झाली होती. त्यावेळी न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत शुक्रवारी २५ जुलैपर्यंत वाढ केली होती. आता पुन्हा यामध्ये न्यायालयाने वाढ केली आहे. केजरीवाल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ८ ऑगस्टला होणार आहे.

Exit mobile version