ड्राय डे’ च्या दिवशी तारीख बदलून मद्यविक्री

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती निमित्त 'ड्राय डे' असताना देखील पंचतारांकित हॉटेलमध्ये मद्यविक्री केली जात होती.

ड्राय डे’ च्या दिवशी तारीख बदलून मद्यविक्री

भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांची २ ऑक्टोबर रोजी जयंती निमित्त सर्वत्र मद्यविक्री करण्यास बंदी असताना अंधेरी येथील पंचतारांकित सहारा हॉटेल मध्ये सर्रास पणे मद्यविक्री असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे २ ऑक्टोंबर रोजी #NODRYDAY अशी जाहिरात सोशल मीडियावर चालू असताना देखील मद्यविक्री करून  ग्राहकांना ३ ऑक्टोंबर रोजीचे बिल दिले जात होते.

पुणे येथे राहणारे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी अक्षय जैन काही कामानिमित्त मुंबईत आले होते. दिवसभर चालणाऱ्या #NODRYDAY ही जाहिरात पाहवायस मिळाली. अक्षय जैन रात्री ८ वाजता पंचतारांकित हॉटेल सहारास्टार मधील मेन्शन क्लब मध्ये गेले असता. महात्मा गांधी जयंती निमित्त ‘ड्राय डे’ असताना देखील सर्रासपणे मद्यविक्री चालू असल्याचे जैन यांना दिसून आले. पुराव्यादाखल जैन यांनी मद्य मागवले. तासभरानंतर बिलाची मागणी केली असता त्या बिलावर पुढील दिवसाची तारीख असल्याचे दिसले. जैन यांची पत्नी ही पेशाने चार्टर्ड अकाऊंट असलेल्या बिलावरील जीएसटी नंबर देखील चुकीचा असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू

नवरात्र २०२२: तिबेटमधील शक्तीपीठ असलेली मनसा देवी

‘आदिपुरूष’ सिनेमाच्या टीझर रिलीजसाठी प्रभास, क्रिती पोहचले अयोध्येत

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल ‘या’ १० खास गोष्टी माहित आहेत का?

पंचतारांकित असलेल्या हॉटेलमध्ये ‘ड्राय डे’ असताना देखील सर्रासपणे मद्यविक्री असल्याचे चित्र दिसून येते. हे केवळ पैशांसाठी केलेला लालचीपणा केल्याचे दिसून येते. असे मत जैन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच जैन यांनी हॉटेल व्यवस्थापकांशी फोन वरुण संपर्क साधला मात्र, कोणीही फोनवर आले नाहीत. संबंधित प्रकरण हे राष्ट्रपित्याचा अपमान केले असून जैन यांनी याबाबत चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे.

Exit mobile version