भिवंडीतून ८०० कोटींचे लिक्विड एमडी ड्रग जप्त, गुजरात एटीएसची कारवाई !

दोघांना अटक

भिवंडीतून ८०० कोटींचे लिक्विड एमडी ड्रग जप्त, गुजरात एटीएसची कारवाई !

गुजरात एटीएस पथकाला मोठे यश मिळाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे गुजरात एटीएसने महाराष्ट्रातील भिवंडी येथील नदी नाका येथील एका फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान तेथून एका बॅरलमध्ये भरलेले १०.९ किलो सेमी लिक्विड मेफेड्रोन (एमडी) आणि दुसऱ्या बॅरलमध्ये भरलेले ७८२.२ किलो लिक्विड मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत ८०० कोटी रुपये असल्याची माहिती आहे. गुजरात एटीएसने छाप्यादरम्यान ड्रग्ज बनवण्यासाठी ठेवलेले ग्राइंडर, मोटर्स, काचेचे फ्लास्क आणि हिटरही जप्त केले आहेत. याप्रकरणी गुजराज एटीएसने दोघांना अटक केली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे ५ ऑगस्ट आणि ६ ऑगस्ट रोजी गुजरात एटीएसच्या पथकाने महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील प्रतिबंधित मेफेड्रोन ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर आणि गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील दहेज इंडस्ट्रियल एरियातील औषधनिर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकला होता. यावेळी मोहम्मद युनूस शेख (४१) आणि त्याचा भाऊ मोहम्मद आदिल शेख (३४) यांना अटक करण्यात आली. हे दोघेही सख्खे भाऊ आहेत.

हे ही वाचा:

‘नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचे मूर्तिमंत रूप’

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना १७ महिन्यानंतर जामीन

पॅरिस ऑलम्पिकमध्ये नीरज चोप्राला ‘रौप्य’ तर पाकिस्तानच्या अर्शदला ‘सुवर्ण’

पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या

एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भावांकडून ८०० किलो लिक्विड प्रतिबंधित मेफेड्रोन ड्रग्ज सापडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ८०० कोटी रुपये आहे. या दोघांनी आठ महिन्यांपूर्वी विविध रसायनांचा वापर करून मेफेड्रोन तयार करण्यासाठी अपार्टमेंट भाड्याने घेतले होते.

१८ जुलै रोजी सुरत शहरातील पलसाना भागात मेफेड्रोन निर्मिती युनिटचा पर्दाफाश करत एटीएसने तिघांना अटक केली होती. या कारवाईदरम्यान ५१.४ कोटींचा कच्चा माल जप्त केला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांकडूननच शेख बंधूंची माहिती मिळाली. त्यानंतर गुटरातच्या एटीएस पथकाने कारवाई करत भिवंडीमध्ये छापा टाकला आणि तो यशस्वी झाला.

Exit mobile version