पश्चिम बंगालच्या सिलिगुडी सफारी पार्कमधील ‘अकबर’ नावाचा सिंह आणि ‘सीता’ नावाच्या सिंहीणाला एकत्र एका पिंजऱ्यात ठेवल्याच्या पश्चिम बंगालमधील वनविभागावारोधात विश्व हिंदू परिषदेने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल शाखेने कोलकाता उच्च न्यायालयाच्या जलपैगुडी खंडपीठाकडे १६ फेब्रुवारी रोजी धाव घेतली होती. त्यावर आता, मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी सुनावणी होईल. या प्रकरणी प. बंगाल सरकारचा वन विभाग प्रशासन आणि बंगालच्या सफारी पार्कच्या संचालकांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने स्पष्टीकरण दिले आहे. हे दोन्ही सिंह १३ फेब्रुवारी रोजी त्रिपुरातील सेपाहिजाला झूलॉजिकल पार्कमधून येथे आणण्यात आले असून त्यांची नावे बदललेली नाहीत, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
गीतकार गुलजार आणि जगद् गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार!
संदेशखाली अत्याचार प्रकरण; तृणमूल नेत्याला अखेर अटक!
देशभरातील न्यायालयांत ४.४७ कोटी खटले प्रलंबित
अकबर हा मुगल सम्राट होता आणि सीता ही वाल्मिकींच्या रामायणातील व्यक्तिरेखा असून तिला हिंदू देवतेप्रमाणे पूजले जाते. मात्र पश्चिम बंगालच्या वनविभागाने सिंहांना सीता आणि अकबर अशी नावे ठेवून तसेच, त्यांची जोडी बनवून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे.