प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाचा फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. फुटबॉल क्षेत्रातील मानाचा असा पुरस्कार ‘बॅलन डी’ओर’ हा यंदा मेस्सी याने जिंकला आहे. लिओनेल मेस्सीने विक्रमी आठ वेळा फुटबॉल जगतातील ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार पटकावला आहे. त्याच्या या यशानंतर मेस्सीवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यंदाच्या या पुरस्कारच्या शर्यतीत लिओनेल मेस्सी समोर मँचेस्टर सिटीच्या एर्लिंग हॅलँडचं तगडं आव्हान होतं. एर्लिंगनं गेल्यावेळी तिहेरी खिताब जिंकला होता. पण, अखेर मेस्सीने या शर्यतीत बाजी मारली असून ‘बॅलन डी’ओर’ पुरस्काराचा तो मानकरी ठरला आहे. इंटर मियामीचे सर्वेसर्वा आणि फुटबॉल विश्वातील दिग्गज डेव्हिड बॅकहॅम यांच्या हस्ते मेस्सीला त्याच्या कारकिर्दीतील आठवा बॅलन डी’ओर पुरस्कार देण्यात आला. सोमवार, ३१ ऑक्टोबर रोजी पॅरिसमधील थिएटर डू शॅटलेटमध्ये रंगलेल्या सोहळ्यात मेस्सीला बॅलन डी’ओर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
लिओनेल मेस्सीनं यापूर्वी २००९, २०१०, २०११, २०२१, २०१५, २०१९ आणि २०२१ मध्ये बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकला आहे. बॅलन डी’ओर हा फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. खेळाडूच्या वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. फुटबॉलपटूंच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे फुटबॉल क्लब आणि राष्ट्रीय संघातील खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
हे ही वाचा:
जर्मन टॅटू कलाकार शानी लूक हिचा हमासकडून शिरच्छेद
केरळ स्फोट; आरोपीला दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक
अफगाणिस्तानने आता वर्ल्डकपविजेत्या श्रीलंकेलाही नमवले
बॅलन डी’ओर पुरस्कार काय आहे?
बॅलन डी’ओर पुरस्कार हा फ्रांसमधील फुटबॉल मासिक बॅलन डिओरच्या वतीने देण्यात येतो. क्लब आणि राष्ट्रीय संघातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात १९५६ साली झाली होती जेव्हा हा पुरस्कार स्टॅनले मॅथ्यूज यांना पहिल्यांदा देण्यात आला होता. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच, २०१८ पासून महिला फुटबॉलपटूंनाही हा पुरस्कार देण्यात येतो.