लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनाला राम राम

लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनाला राम राम

जगातील आजवरच्या महान फुटबॉलपटूंपैकी एक लिओनेल मेस्सी याने बार्सिलोना या क्लबला राम राम ठोकला आहे. बार्सिलोना क्लबकडून आज या विषयीचे अधिकृत वृत्त देण्यात आले. मेस्सी आणि बार्सिलोना या दोघांनाही आगामी वर्षासाठी करार करायची इच्छा होती. पण आर्थिक गणित न जमल्याने हा करार होणार नाही असे सांगण्यात येत आहे.

या आधीही अनेकदा लिओनेल मेस्सी बार्सिलोना संघ सोडणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण प्रत्येक वेळी मेस्सीला थांबवण्यासाठी बार्सिलोना संघ यशस्वी ठरला आणि यावेळी मात्र क्लबची आर्थिक स्थिती लक्षात घेता मेस्सीला अपेक्षित असलेल्या किंमतीचा करार करणे क्लबला शक्य नाही. त्यामुळेच लिओनेल मेस्सी आता आपल्याला बार्सिलोना कडून खेळताना दिसणार नाही.

हे ही वाचा:

सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत पदक

प्रत्येक हॉकी खेळाडूसाठी पंतप्रधान मोदींचे खास ट्विट

भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करूनही का ट्रोल झाला फरहान अख्तर?

हे सरकार नेमके कोणाचे?

मेस्सीच्या मुख्य फुटबॉल करिअरची सुरुवात हे बार्सिलोना संघापासूनच झाली. २००४ साली बार्सिलोनाच्या मुख्य संघाकडून मेस्सीने पदार्पण केले. तेव्हापासून २०२१ पर्यंत म्हणजेच तब्बल सोळा वर्ष तो बार्सिलोना संघाकडून खेळला. बार्सिलोनाकडून खेळताना मेस्सीने अनेक नवे विक्रम केले. जसे की सलग चार वेळा बलोन दी ओर हा पुरस्कार जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याने आजवर तब्बल ६ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. तर एका सीजनमध्ये केवळ ‘ला लिगा’ (स्पॅनीश फुटबॉल स्पर्धा) नाही तर संपूर्ण युरोपियन खंडातीलस र्वाधिक गोल करणारा तो खेळाडू ठरला. मेस्सी हा बार्सिलोनासाठीचा आजवरचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे.

मेस्सी कोणत्या क्लबला जाणार?
बार्सिलोना ला निरोप दिल्यानंतर लिओनेल मेस्सी आता कोणत्या देशात आणि कोणत्या क्लबकडून फुटबॉल खेळताना दिसणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. यामध्ये मॅंचेस्टर सिटी या संघाकडे मेस्सी जाण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एके काळी बार्सिलोनाचे कोच राहिलेले आणि जगभरातील काही नावाजलेल्या प्रशिक्षकांपैकी एक पेप ग्वार्डीओला हे सध्या मँचेस्टर सिटी या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम बघत आहेत. त्यामुळेच आपल्या या जुन्या चेल्याला मँचेस्टर सिटीला ते घेऊन येऊ शकतात असे अनेकांना वाटते.

Exit mobile version