अबू धाबीत बांधलेल्या हिंदू मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा!

एका महिन्यात ३.५ लाख लोकांनी मंदिराला दिली भेट

अबू धाबीत बांधलेल्या हिंदू मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा!

अबू धाबीमध्ये बांधलेल्या पहिल्या हिंदू मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.सर्व सामान्य भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात आल्यानंतर एका महिन्यात तब्बल साडेतीन लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली आहे.मंदिर प्रशासनाने ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले होते. १ मार्च रोजी सर्व सामान्य भक्तांसाठी या मंदिराचे द्वार खोलण्यात आले.

मंदिर प्रशासनाने माहिती दिली की, मंदिर खुले करण्यात आल्यानंतर पहिल्या महिन्यात सुमारे ३.५ लाख भाविक दर्शनासाठी येत होते अन त्यापैकी ५० हजार प्रत्येक आठवड्याच्या शेवटी (शनिवार-रविवार) आले.दरम्यान, मंदिरात आठवड्याच्या दर सोमवारी प्रार्थना असते अन यासाठी संपूर्ण मंदिर भाविकांसाठी बंद असते, पाहायला गेले तर ही आकडेवारी केवळ २७ दिवसांची आहे.कारण मार्चचा महिना हा ३१ दिवसांचा होता.

हे ही वाचा:

“आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला भक्कम बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात पाया रचला”

छत्तीसगडमध्ये ८ तास चाललेल्या चकमकीत १३ माओवादी ठार!

विजेंदर सिंगचा काँग्रेसला ठोसा!

राघव चढ्ढा कुठे आहे?

दरम्यान, अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते (१४ फेब्रुवारी) पार पडले.बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने (बीएपीएस) हे विशाल हिंदू मंदिर बांधले आहे.हिंदूंचे मंदिर उभारण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीने जमीन दान केल्यानंतर या मंदिराचे बांधकाम २०१९ मध्ये सुरू झाले.या मंदिरात गंगा आणि यमुनेचे पवित्र पाणी आणि राजस्थानचा गुलाबी वाळूचा दगड वापरण्यात आला आहे.या मंदिराच्या दोन्ही बाजूंनी गंगा आणि यमुनेचे पवित्र पाणी वाहत आहे, जे भारतातून मोठ्या कंटेनरमध्ये आणले गेले आहे.

Exit mobile version