बुधवारी ७ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाचा मुंबईतील सर्वच भागांना तडाखा बसला होता. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांवर तुडुंब पाणी भरले होते. लोकलच्या रुळावर पाणी भरल्याने उपनगरीय रेल्व सेवा विस्कळीत झाली होती. वादळी पावसाबरोबर विजेचा कडकडाटसह मेघगर्जना होत होती. त्यात विजेचा तडाखा बोरिवली येथील एका हौसिंग सोसायटीला बसला आहे. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांच्या गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले आहे.
Borivali, Mumbai yesterday ⚡️
It surely was scary! Luckily they had installed a lightning rod in the bldg so If the lightning strikes it directly goes to the ground! #Mumbai #Borivali pic.twitter.com/KR94GedXwt— 𝐈𝐬𝐡𝐢𝐭𝐚 𝐉𝐨𝐬𝐡𝐢 🇮🇳 (@IshitaJoshi) September 8, 2022
बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यादरम्यान बोरिवली येथील एका गृहनिर्माण संस्थेच्या पाण्याच्या टाकीवर विजेचा जोरदार तडाखा बसला. नैसर्गिक घटनेमुळे इमारतीतील संगणक, फ्रीज आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान झाले. बोरिवली पश्चिम येथील नेमिनाथ सोसायटीत सायंकाळी ५:३० वाजता ही घटना घडली असून शेजारील इमारतीतील राहिवासीयांनी मोबाईलच्या माध्यमातून घटनेचे चित्रण केले.
हे ही वाचा:
‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’
राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा
बद्रिनाथला मुंबईतील भाविकांची कार दरीत काेसळली आणि
विसर्जन घाटावर जनरेटरची वायर तुटून ११ भाविक जखमी
नेमिनाथ सोसायटीमधील रहिवासी धनंजय देसाई यांनी दिलेल्या माहिती नुसार, बुधवारी मेघगर्जनेसह वादळी वारा वाहत होता. याच दरम्यान काही वेळानंतर मेघगर्जनेसह वीज कोसळली. या सोसायटीमध्ये ५१ रहिवाशी राहत असून अनेक फ्रीज, कॉम्प्युटर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर इलेट्रॉनिक्स वस्तूचे नुकसान झाले आहे. सुरक्षित कारणास्थव सोसायटीमधील विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला होता. तसेच एका रहिवाशाच्या एअर कंडिशनरचेही नुकसान झाले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.