साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या मराठवाड्याच्या मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावर श्री रेणुकादेवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. नवरात्रात या गडावर भाविकांची मोठी गर्दी असते. रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी २४० पायऱ्या चढून जावे लागते. परंतु आता भाविकांना या पायऱ्या चढण्याची गरज भासणार नाही. भाविकांच्या सोयीसाठी येथे आता लवकरच लिफ्ट आणि स्कायवॉक उभारला जाणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १९ मे रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. माहूरगडावरील श्री रेणुकामाता, श्री दत्त शिखर व श्री अनसूया माता मंदिरासाठी एरियल रोप वे प्रकल्पासाठी २००९मध्ये रस्ते केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्रालयाची मंजुरी मिळाली होती. त्यासाठी ५१ कोटी ३० लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला. तांत्रिक कारणाने हा प्रकल्प रद्द झाला होता. आता याच खर्चात मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी लिफ्ट व स्कायवॉक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आता माहूर येथे नव्याने मंजूर कामाचे भूमिपूजन १९ मे रोजी होणार असून सर्व संबंधितांना यासंदर्भात रस्ते विकास मंत्रालयाकडून पत्राद्वारे सूचनाही देण्यात आल्या असल्याचे वृत्त दिव्या मराठीने दिले आहे. नवीन सुविधा झाल्यानंतर भाविकांना रेणुका दर्शनासाठी लिफ्ट व स्कायवॉकच्या माध्यमातून थेट मंदिराच्या प्रांगणापर्यंत पोहोचता येणार आहेत.
ही लिफ्ट ५१ फुटी उंचीची असून यात एका वेळी २० भाविक जातील एवढी क्षमता आहे. स्कायवॉक १२० मीटर लांबीचा तीन खंडांत एकमेकांना लिफ्टने जोडला जाणार आहे. भाविक लिफ्टने स्कायवॉकच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचतील. त्यानंतर काही अंतर चालत पुढे जावे लागेल. मग तेथील लिफ्टने दुसऱ्या टप्प्यावर जाता येईल व तेथून आणखी काही अंतर चालल्यानंतर लिफ्टने तिसऱ्या टप्यावर पोहोचता येईल. हा टप्पा अंतिम असून थेट श्री रेणुकामाता मंदिरात पोहोचेल, असे नियोजन करण्यात आले आहे.
माहूरगडावर रेणुकामातेच्या दर्शनासाठी आता चार लिफ्ट, १२० मीटरचा स्कायवॉक होणार आहे. तसेच या ठिकाणी दिव्यांगांना व्हीलचेअरची सुविधाही असणार आहे. या कामाची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १९ मे रोजी भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात रोपवेचे काम होईल.असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत झरीकर यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
एकलव्य खाडेचे वेगवान शतक; एजिस फेडरल वेंगसरकर अकादमी विजयी
भारतीय सैन्याच्या सेवेत एक बकरा तोही हवालदार?
आतिक अहमदच्या कार्यालयात आढळलेले रक्ताचे डाग माणसाचेच!
भारतीय सैन्याच्या सेवेत एक बकरा तोही हवालदार?
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता. माहूर गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. माहूर गड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूर गडावर रेणुके तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देऊळे इथे आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजाने बांधले असे. आख्यायिका आहे की दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला.