‘जाणता राजा’ चे १२५० प्रयोग ते शिवचरित्रावर बारा हजारपेक्षा अधिक व्याख्याने! वाचा बाबासाहेबांचा जीवन प्रवास

‘जाणता राजा’ चे १२५० प्रयोग ते शिवचरित्रावर बारा हजारपेक्षा अधिक व्याख्याने! वाचा बाबासाहेबांचा जीवन प्रवास

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज निधन झाले. सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपले १०० वर्षांचे आयुष्य त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या व्यक्तीमत्वाला वाहून घेतले होते. शिवकालीन इतिहासाच्या वेडाने त्यांना झपाटले होते. त्यांचा इतिहासाला समर्पित असलेला जीवन प्रवास थक्क करणारा आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असे होते. १९२२ साली जुलै महिन्याच्या २९ तारखेला पुण्याजवळच्या सासवड येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच इतिहासाचे वेड त्यांन् जडले होते. वडिलांच्या साथीने गड किल्ल्यांवर फिरायला जाणे हा त्यांचा आवडता छंद. अशातच छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तीमत्वाने त्यांना भूरळ पाडली. पुढे गो.नी.दांडेकरांसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांच्या सहवासात बाबासाहेब घडत गेले.

शिवरायांचा इतिह्स त्यांनी घराघरात पोहोटवला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जवळपास १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. तर शिवकालीन ऐतिहासिक दस्तावेजांचाही त्यांनी अभ्य़ास केलेला आहे.

बाबासाहेबांनी ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक असे प्रदीर्घ लेखन केले. ललित कादंबरी, नाट्यलेखन, जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. तर वेळ पडेल तेव्हा ते या नाटकात अभिनेत्याच्या भूमिकेतही दिसले. २०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण, तर २०१९ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जाणता राजा नाटकाचे त्यांनी १२५० प्रयोग केले. बाबासाहेबांचे निवेदन आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जादुई आवाज अशा दुग्धशर्करा योगाने सजलेल्या ‘शिवकल्याण राजा’ या गीत संग्रहाने तर अनेक पिढ्यांना भूरळ घातली.

हे ही वाचा:

कार्तिकी एकादशीला माऊलीची आणि लेकरांची भेट होणार…

महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

तुमच्याकडून लाच तर घेतली गेली नाही ना, पंतप्रधानांनी विचारला प्रश्न…काय आहे प्रकरण?

मिलिंद तेलतुंबडे यमसदनी! गृहमंत्र्यांनी केले शिक्कामोर्तब

लहानपणापासूनच म्हणजे अवघ्या सहाव्या वर्षापासून ते वडिलांसोबत किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यासाठी जात असत. सायकल, पायी, रेल्वे, जलमार्ग अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रवास करत ते इतिहासाचे संशोधन करत. त्यांच्या प्रेरणेतून अनेक शिवभक्त, गडप्रेमी तयार झाले. बाबासाहेबांनी राष्ट्रभक्ती जागविली. इतिहासाचे वेड तरुणांमध्ये निर्माण केले. त्यातूनच प्रेरणा घेऊन असाच इतिहासाचा धांडोळा घेणारे अनेक तरुण तयार झाले.

बाबासाहेबांचे साहित्य:  आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, पुरंदऱ्यांची नौबत, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजऱ्याचे मानकरी, राजगड, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, लालमहाल, शिलंगणाचं सोनं, शेलारखिंड. सावित्री.

Exit mobile version