गोरेगाव येथील रस्त्याला सहकारश्री शिवाजीराव शिंदे यांचे नाव देऊन गौरव

गोरेगाव येथील रस्त्याला सहकारश्री शिवाजीराव शिंदे यांचे नाव देऊन गौरव

गोरेगाव येथील फिल्मसिटी रोडला समांतर असलेल्या जवळपास दीड किमीच्या रस्त्याला सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सहकारश्री ऍड. शिवाजीराव शिंदे यांचे नाव देण्यात आले. शिवाजीराव शिंदे यांच्या राहत्या घरासमोर असलेल्या या रस्त्याला हे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते नामकरणाचा हा कार्यक्रम झाला. यावेळी मुंबईचे उपमहापौर मुंबईचे उप महापौर ऍड. सुहास वाडकर, कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उद्योगपती प्रशांत कारुळकर, भाजप जिल्हा सचिव देवेश यादव हे उपस्थित होते.

कोण आहेत सांगली सहकारी बँकेचे संस्थापक शिवाजीराव शिंदे?

शिवाजीराव शिंदे हे सांगली सहकारी बँकेचे संस्थापक चेअरमन असून त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गावात झाला. शिवाजीराव शिंदे यांचे वडील तळेगाव पुण्यात सरकारी दवाखान्यात इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. त्यामुळे ते कुटुंबासोबत तळेगावात वास्तव्यास आले होते. शिवाजीराव शिंदे हे पुढे मुंबईत शिक्षणासाठी आले.

शिवाजीराव हे जेव्हा मुंबईत आले तेव्हा मुंबईत त्यांच्या ओळखीचे कोणीही नव्हते. तेव्हा ओळखीच्या लोकांकडे राहून, काम करून त्यांनी मुंबईत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये त्यांनी बी.ए. आणि बी.कॉम या पदव्या घेतल्या. त्यांनी एलएलबीची पदवीही घेतली. त्यानंतर त्यांनी काही काळ रेल्वेमध्ये नोकरी केली. कालांतराने त्यांनी बेस्टमध्येही नोकरी केली.

दरम्यानच्या काळात सहकार चळवळीने जोर धरला असल्याने त्यांनीही या चळवळीत आपले योगदान देण्याचे ठरवले. तेव्हा त्यांनी आपल्या जिल्ह्यातील लोकांसाठी मुंबईत सहकारी बँक सुरू करण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांच्या घराघरात फिरून भांडवल जमवून सांगली जिल्हा कामगार सहकारी बँक स्थापन केली. त्यानंतर शिवाजीराव शिंदे यांचे कुटुंबदेखील मुंबईत वास्तव्यास आले.

कालांतराने या सहकारी बँकेच्या सहा शाखा स्थापन झाल्या. शिवाजीराव शिंदे यांची सामाजिक जाण आणि त्यांचे कार्य लक्षात घेता शारदाश्रम विद्यामंदिराने त्यांना सचिव पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. शिवाजीराव शिंदे यांनीही सचिव पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी शाळांमध्ये खासगी बसची मोनोपॉली होती. शिवाजीराव शिंदे यांनी प्रथम ही मोनोपॉली मोडून काढत कंत्राटी पद्धती सुरू केली. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे त्यांना अनेक धमक्या देण्यात आल्या. मात्र तरीही त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

शिवाजीराव शिंदे यांना २००१ मध्ये त्यांच्या योगदानासाठी सरकारने ‘सहकार श्री’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते त्यांना सांगलीत हा पुरस्कार देण्यात आला.

हे ही वाचा:

‘गौप्यस्फोटापेक्षा आपटी बार बरा असतो’

‘आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है’

कोविड जम्बो सेंटर घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांनी केली ८९ पानांची तक्रार

दाऊदची बहीण हसिना पारकरच्या मालमत्तेवर ईडीची धाड

त्यानंतर त्यांनी मृत्यूनंतरच्या १२ ते १३ दिवसांच्या ज्या विधी करतात त्या विधी पाच दिवस कराव्यात हा संदेश दिला. गेल्या १५ वर्षांपासून सांगलीतील म्हैसाळ गाव आणि या गावाच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये मृत्यूनंतरच्या विधी पाच दिवसांमध्ये केल्या जातात. त्यासाठीही त्यांना खूप विरोध झाला. तसेच ते काही दादर, मालाड येथील पतसंस्थांमध्ये तंत्रज्ञ सल्लागार म्हणून देखील काम पाहत होते.

शिवाजीराव शिंदे यांच्या कार्याची दखल घेत मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून फिल्म सिटीला समांतर असलेल्या १.३५ किलोमीटरच्या मार्गाचे सहकार श्री ऍड. शिवाजी राव शिंदे मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. रविवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबईचे उप महापौर ऍड. सुहास वाडकर, कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उद्योगपती प्रशांत कारुळकर, भाजप जिल्हा सचिव देवेश यादव हे उपस्थित होते.

Exit mobile version