नव्या कोरोना रुग्णांची संख्या लाखापेक्षा कमी

नव्या कोरोना रुग्णांची संख्या लाखापेक्षा कमी

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता कोव्हिडची साथ नियंत्रणात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण, गेल्या २४ तासांमध्ये देशभरात अवघ्या ८६,४९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट शिगेला असताना देशात प्रत्येकदिवशी चार लाखांच्या आसपास नवे रुग्ण सापडत होते. मात्र, आता हे प्रमाण एक लाखापेक्षा कमी झाल्याने ही भारताच्यादृष्टीने दिलासादायक बाब मानली जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या आकेडवारीनुसार सोमवारी दिवसभरात देशभरात ८६,४९८ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर २१२३ जणांचा मृत्यू झाला.

येत्या २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्वांना मोफत लस देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल. ज्यांना मोफत लस नको असेल, खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणार असतील तर त्यांना २५ टक्के लसी उपलब्ध असतील. खासगी रुग्णालयात १५० रुपये भरून लस घेता येईल, असं मोदींनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

समन्वय प्रतिष्ठानमार्फत ३००० ठाणेकरांचे लसीकरण

एकीकडे वाफा, दुसरीकडे तोहफा…

ईश्वर सेवेबद्दलचा संभ्रम का वाढवत नेताय?

पुणे आग: मोदींनी जाहीर केली मदत, मुख्यमंत्री ठाकरे निद्रिस्त

कोरोना विरोधात कोव्हिड प्रोटोकॉल आणि व्हॅक्सिन संरक्षण कवच म्हणून उपयोगी पडले आहे. जगातील अनेक देशाला व्हॅक्सिनची मोठी गरज होती. पण त्यांच्याकडे व्हॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या कंपन्या नव्हत्या. भारताकडे व्हॅक्सिन नसती तर काय झालं असतं याचा विचार करा, असं ते म्हणाले. २०१४ मध्ये व्हॅक्सिनेशनचे कव्हरेज ६० टक्के होते. या गतीने व्हॅक्सिनेशन केलं असतं तर ४० वर्ष लसीकरणाला लागले असते. मात्र आपण व्हॅक्सिनेशनचा वेग वाढवला. त्याची व्याप्तीही वाढवली. भारतात आतापर्यंत २३ कोटी व्हॅक्सिन देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Exit mobile version