कमी चाचण्या म्हणूनच कमी रुग्णसंख्या

कमी चाचण्या म्हणूनच कमी रुग्णसंख्या

मुंबई भाजपाचे पालिकेवर शरसंधान

राज्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होते आहे, असा दावा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला असला तरी मुंबई भाजपाने मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना का फसवत आहे, असा दावा करत त्याची आकडेवारीच सादर केली आहे.

मुंबई भाजपाने ट्विट करत २४ एप्रिल ते ३ मे या कालावधीतील मुंबईत नव्या रुग्णांची संख्या आणि होत असलेल्या करोना चाचण्या यांच्यातील तुलनाच स्पष्ट केली आहे. कमी चाचण्या केल्यामुळे रुग्णसंख्या कमी आहे, असा आरोपही या ट्विटद्वारे मुंबई भाजपाने केला आहे.

हे ही वाचा:

करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांवर बदमाशांची नजर

पवारांना पुन्हा पंतप्रधान पदाचे वेध

कोविडयोद्धे पोलिस बांधवांनो तुमच्यासाठी काय पण..

ठाणेकरांसाठी भाजपातर्फे प्लाझ्मा हेल्पलाईन

२४ एप्रिलला ३९५८४ चाचण्या केल्या गेल्या तेव्हा नव्या रुग्णांची संख्या ५८८८ होती. पुढच्या दिवशी चाचण्या ४०२९८ होती तर रुग्णसंख्या ५५४२ इतकी होती. १ मे रोजी ३७६०७ चाचण्या झाल्यावर मात्र रुग्णांची संख्या ३९०८ होती. पुढच्या दोन दिवसांत हे प्रमाण असेच घसरत गेले असा दावा मुंबई भाजपाने ट्विटद्वारे केला आहे. २ मे रोजी २८६३६ चाचण्या आणि ३६७२ रुग्णसंख्या तर ३ मे रोजी २३५४२ चाचण्या आणि २६६२ इतकी रुग्णसंख्या दाखविण्यात आली आहे.

चाचण्या कमी केल्यामुळे रुग्णसंख्या कमी आहे, हा दावा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी फेटाळला होता. राज्यात प्रतिदिन ८० हजार चाचण्या होत असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी महाराष्ट्राची स्तुती केल्याचेही ते म्हणाले होते.

लसीकरण हा करोनावरील उपाय आहे. आम्ही १८ लाख लसींच्या खरेदीसाठी अर्ज केला आहे. जोपर्यंत लसींचा पुरवठा होत नाही तोपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण करता येणार नाही, असेही ते म्हणाले.

 

Exit mobile version