राज्यात एकीकडे निर्बंधांचा फेरा कायम असला तरी, कोरोना रुग्णांची संख्या काही आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळेच आता ठाकरे सरकारने पुन्हा एकदा जनतेवर निर्बंध लागू केले आहेत. एकीकडे ठाकरे सरकारने निर्बंध लावले, पण दुसरीकडे चित्र अतिशय विदारक आहे.
महाराष्ट्रात सद्यस्थितीत सात जिल्ह्यांची परिस्थिती ही अतिशय बिकट आहे. महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, पालघर, उस्मानाबाद, बीड हे जिल्हे बिकट अवस्थेत आहे. या सातही जिल्ह्यांमधील संसर्गाचे प्रमाण हे चिंताजनक आहे. मुख्य म्हणजे या सात जिल्ह्यांमध्ये चाचण्यांची संख्या सर्वाधिक कमी आहे.कोरोना चाचण्यांची संख्या कमी केल्यामुळे रुग्णवाढीचे प्रमाण लक्षात येत नाही.
हे ही वाचा:
अनिल देशमुख यांनी ईडीकडे मागितला वेळ
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाचे चक्का जाम आंदोलन सुरू
गुन्हेगारी टोळ्यांची धुंदी उतरवणार एनसीबी
भारताने केली पिनाका आणि १२२ एमएम कॅलिबर रॉकेटची यशस्वी चाचणी
गेल्या महिन्याभरात २१ टक्के कोरोना चाचण्यांमध्ये घट झाल्याची आता निदर्शनास आले आहे. दरदिवशी सरासरी २ लाख ६८ हजार चाचण्या केल्या जात होत्या. त्या चाचण्याची संख्या आता रोडावल्यामुळे रुग्ण सापडत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून प्रतिदीन चाचण्यांची संख्या २१ टक्के घटलेली आहे. मे मध्ये करण्यात आलेल्या चाचण्या आणि जूनमधील चाचण्या यामध्ये चाचण्यांची संख्या घटलेली आढळली. त्यामुळे रुग्णवाढही दिसून येत नाही हे आता स्पष्ट झालेले आहे. कोरोना कृती दलाचे सदस्य शशांक जोशी म्हणतात, जास्तीत जास्त चाचण्या करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाला सूचित केले आहे.
ठाकरे सरकारचा आरोग्य विभागावर नसलेले नियंत्रण हे सामान्यांसाठी जीवघेणे ठरू शकते. कुचकामी आरोग्यव्यवस्था आणि कोरोना तिसरी लाट या सर्वांमध्ये अजून किती जणांचा बळी आता घेतले जाणार, हा सर्वसामान्यांचा प्रश्न अनुत्तरीत आहे.