वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन सोसायटीच्या संशोधनातून बिबट्यांबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. जंगलात बिबट्यांचे आवडते भक्ष्य श्वान म्हणजेच भटकी कुत्रे आहेत. तुंगारेश्वरमधील बिबट्यांच्या आहारात ६६.७६ टक्के वाटा भटक्या कुत्र्यांचा, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांच्या आहारातील भटक्या कुत्र्यांच्या ३२.०१ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे.
वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन सोसायटी व इंडियाने वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र वनविभागाच्या सहकार्याने संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. या संशोधनात बिबट्यांच्या विष्टेतील केसांचे नमुने तपासून बिबट्यांचा आहार समजून घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.
“बिबट्यांना चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी या क्षेत्रातील संशोधन कार्य आम्ही पुढेही असेच सुरु ठेवणार आहोत. रेडिओ कॉलर बसवलेल्या बिबट्यांच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण आम्ही करत आहोत.” अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकांनी दिली आहे.
तसेच वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते या मार्गाने बिबट्यांचा अधिक अभ्यास करत आहेत. ते म्हणले,” अभ्यासातील निष्कर्ष आम्हला अशा आव्हानात्मक भूभागात, बिबटे भक्ष्याची निवड कशी करतात यावरील संशोधनाचे नवीन मार्ग खुले करत आहे. ”
हे ही वाचा:
‘कळसूत्री सरकारचा पंचसूत्री अर्थसंकल्प’
निवडणूक विजयानंतर पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो
हा तर उधारीचा वायदा करणारा अर्थसंकल्प
योगी पुन्हा मुख्यमंत्री होणार, मग मुनव्वर राणा कुठे जाणार?
दरम्यान, बिबट्या हा पँथेरा वंशातील सध्याच्या पाच प्रजातींपैकी एक आहे. त्यांचे आयुष्य १२ ते १७ वर्ष असते. बिबट्या हे आफ्रिकेत , पश्चिम आणि मध्य आशियाच्या काही भागांमध्ये तसेच दक्षिण रशियामध्ये आणि भारतीय उपखंडात दक्षिणपूर्व आणि पूर्व आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.