भारतातील बिबट्यांची संख्या २०१४ मध्ये ८,००० होती ती वाढून २०१८ मध्ये १२,००० झाली असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे. वाघ, सिंह यांच्या संख्येत देखील वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१८ मध्ये प्रसिध्द झालेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात म्हणाले की, २०१४ मध्ये ८,००० बिबटे होते. वाघ, आशियाई सिंह यांच्या नंतर आता बिबट्यांच्या संख्येत झालेली वाढ भारताचे पर्यावरण संरक्षणाचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचे निर्देशक आहेत.
हे ही वाचा: ३,००० मीटर उंचीवर दिसला वाघ.पर्यावरणप्रेमींमध्ये जागतिक तापमानवाढीबाबत चिंता
भारतात बिबट्यांची २०१८ मधली आकडेवारी पाहता एकूण १२,८५२ बिबट्यांपैकी सर्वात अधिक ३,४२१ बिबटे मध्य प्रदेश राज्यात होते. त्याखालोखाल कर्नाटक (१,७८३) आणि महाराष्ट्र (१,६९०) या राज्यांचा क्रमांक लागतो.
बिबट्यांच्या अधिवासात मोठे वैविध्य आढळून आले आहे. मध्य भारत, पूर्व घाट आणि शिवालिक पर्वतांपर्यंत या बिबट्यांचा वावर आढळला आहे. या मोजणीनुसार सर्वात जास्त बिबटे मध्य भारतात आढळले आहेत तर, त्यानंतर पूर्व घाटाचा क्रमांक लागतो. या ठिकाणी अनुक्रमे ८,०७१ आणि ३,३८७ बिबटे आहेत. शिवालिक पर्वत आणि गंगा खोऱ्यात १,२५३ बिबटे आढळले आहेत.