24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेष...असा केला बिबट्याने निर्मलादेवींवर हल्ला

…असा केला बिबट्याने निर्मलादेवींवर हल्ला

Google News Follow

Related

गोरेगाव येथे बिबट्यांचे वास्तव्य आता फारसे नवीन राहिलेले नाही. अनेकवेळा लोकवस्तीत असे बिबटे आढळले आहेत. आरे दूध डेअरीच्या बाजुला असलेल्या मिल्क कॉलनीत मात्र घडलेल्या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

निर्मलादेवी रामबदन सिंग या ५५ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सीसीटीव्हीत दिसते की, निर्मलादेवी आपल्या घरातून बाहेर येतात. साधारणपणे रात्री पावणेआठची वेळ असावी. चालता येत नसल्यामुळे निर्मलादेवी काठी टेकत घराबाहेर पडतात आणि थोडे अंतर चालून गेल्यावर तिथेच असलेल्या एका छोट्या कठड्यावर बसतात. सीसीटीव्हीत एका कोपऱ्यात बिबट्या आलेला दिसतो.

निर्मलादेवी बाहेर आल्यावर तो दबा धरून तिथेच बसतो. रात्री त्याचे डोळे चमकताना दिसतात. मात्र निर्मलादेवींना बिबट्य़ा आपल्या जवळ आहे याची खबरच नसते. त्या काठी टेकत कठड्याजवळ येतात आणि कठडा स्वच्छ करून बसतात. तेवढ्यात मागून बिबट्या दबक्या पावलांनी त्यांच्या जवळ येतो आणि त्यांना पंजा मारतो. पण त्याला पाहिल्यावर सावध झालेल्या निर्मलादेवी त्याला हाकलण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तो त्यांच्या अंगावर उडी मारण्याचा प्रयत्न करतो. त्या नादात त्या कठड्यावरून मागच्याबाजुला कोसळतात.  हातात असलेल्या काठीने त्या बिबट्याला त्या मारतात आणि आरडाओरडाही करतात. त्यामुळे आजुबाजुची माणसे गोळा होतात. ते पाहून बिबट्या पळून जातो.

हे ही वाचा:

ब्रिटनमध्ये पेट्रोल पंपांवर सैनिक पाठवण्याची वेळ का आली?

…आणि अखेर चीनची अर्थव्यवस्था मंदावली

अनिल देशमुखांना दिलासा नाही; सुनावणी ४ ऑक्टोबरला

मीरा- भाईंदर पालिका अधिकारी दीपक खंबित यांच्या गाडीवर गोळीबार

बिबट्याने जोरदार आक्रमण केलेले नसल्यामुळे निर्मलादेवींचा जीव या घटनेत बचावला आहे. पण चेहऱ्यावर बिबट्याच्या नखांमुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. तसेच पायांनाही बिबट्याने नखांनी ओरबाडले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा