काँक्रीटच्या जंगलात वाढला बिबट्याचा वावर!

काँक्रीटच्या जंगलात वाढला बिबट्याचा वावर!

नॅशनल पार्क लगतच्या परिसरात, आजूबाजूच्या इमारतींच्या आवारात आणि गोरेगावमधील काही इमारतींच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याचा अधिवास असलेल्या आरे दुग्ध वसाहतीच्या परिसरातील जंगल आक्रसल्याने या भागात बिबट्या आणि मानव संघर्ष प्रचंड वाढला आहे. गेल्या महिन्याभरात बिबट्याने या भागातील पाच रहिवाशांवर हल्ले केले असून बुधवारी (२९ सप्टेंबर) एका ज्येष्ठ नागरिक महिलेवर बिबट्याने हल्ला केला.

आरेतील विसावा इमारतींच्या जवळ असणाऱ्या वसाहतीत राहणाऱ्या निर्मला सिंह (६९) यांच्यावर बिबट्याने बुधावारी हल्ला केला. त्यापूर्वी २६ सप्टेंबरला आयुष यादव या चार वर्षीय मुलाला बिबट्याने पळवून नेल्याचा प्रयत्न केला होता. आयुषच्या मामाने त्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवले होते. १८ सप्टेंबरला युनिट ३१ इथे ११ वर्षीय रोहितवर बिबट्याने हल्ला केला होता, त्यावेळी त्याच्या वडिलांनी बिबट्यावर प्रकाशझोत टाकून रोहितचा जीव वाचवला होता. सप्टेंबरच्या सुरुवातीला युनिट ३२ मध्येही एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला होता. ऑगस्टमध्ये लक्ष्मी उंबरसडे या महिलेवरही बिबट्याने हल्ला केला होता.

हे ही वाचा:

यंदाही नियमांचा नवरात्रोत्सव!

सिटी बँक गैरव्यवहार प्रकरणी आनंद अडसूळ यांना दिलासा नाही

स्मृती मानधना ठरली कसोटी शतक झळकाविणारी पहिली भारतीय

खळबळजनक! मुंबईच्या केईएममध्ये एमबीबीएसच्या २९ विद्यार्थ्यांना कोरोना

या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये चांगलीच घबराहट निर्माण झाली आहे. जंगलामधील वाढत्या बांधकामामुळे बिबट्याचा वावर वस्तीमध्ये वाढला आहे. वन विभागाने बांधकामांना वन क्षेत्रात परवानगी देऊ नये म्हणून पर्यावरण संघटनांनी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. तरीही बांधकामे सुरूच आहेत. भटक्या श्वानांचा अधिक वावर होऊ देऊ नका, बिबट्या त्यांची सहज शिकार करतो असेही आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version