राष्ट्रपती भवनात शपथविधीला पोहचला बिबट्या? व्हिडिओ व्हायरल !

शपथविधी दरम्यान दिसला रहस्यमय प्राणी

राष्ट्रपती भवनात शपथविधीला पोहचला बिबट्या? व्हिडिओ व्हायरल !

नरेंद्र मोदींनी रविवारी (९ जून) दिल्लीतील राष्ट्रपती भवनात ७२ मंत्र्यांसह सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या भव्य शपथविधी सोहळ्याला परदेशी नेते, इतर मान्यवर, उद्योगपती आणि चित्रपट कलाकारांसह जवळपास ८ हजार पाहुणे उपस्थित होते.

दरम्यान, शपथविधी सोहळ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक रहस्यमय प्राणी राष्ट्रपती भवनात फिरताना दिसत आहे. हा रहस्यमय प्राणी हुबेहूब बिबट्या असल्यासारखे दिसत आहेत.

या रहस्यमय प्राण्याला नेटकऱ्यांनी बिबिट्या, कुत्रा अथवा मांजर अशी नावे दिली आहेत.

मध्य प्रदेशचे भाजप खासदार दुर्गा दास मंचावर अधिकृत प्रक्रिया पार पाडत असताना हा प्रकार घडला. व्हिडिओमध्ये खासदार दुर्गा दास मंचावर अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहेत.

शपथ घेतल्यानंतर काही सेकंदांनी त्यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिवादन केले. त्याच वेळी त्यांच्या पाठीमागे भवनाच्या शिड्यांवर एक रहस्यमय प्राणी पुढे सरसावताना दिसत आहे.

लांब लचक अंग आणि शेपटी असलेला, जणूकाय बिबट्या असल्या सारखाच तो प्राणी दिसत आहे.

हे ही वाचा:

‘ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अथलेटिक्स’च्या खेळाडूंची दमदार कामगिरी!

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा

कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आजपासून खुला!

मोदी ३.O चा पहिला निर्णय बळीराजासाठी; किसान सन्मान निधीचा १७ वा हफ्ता जारी

दरम्यान, हा व्हिडिओ सोहळा मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकरी तर्क-वितर्क लावत आहेत. हा बिबिट्या?, कुत्रा? किंवा मांजर? तर नाही ना, असा प्रश्न नेटकरी विचारात आहेत.

“जर ती मांजर असेल तर ठीक आहे. परंतु जर तो बिबट्या असेल तर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोच, तसे असेल तर सुरक्षा रक्षक राष्ट्रपती भवनात काय करत होते, असा सवाल एका नेटकाऱ्याने उपस्थित केला आहे.

एकाने या प्राण्याला कुत्रा म्हणून संबोधले आहे.दरम्यान, राष्ट्रपती भावनाकडून अद्याप या रहस्यमय प्राण्याबद्दल काही माहिती देण्यात आलेली नाही.

Exit mobile version