ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील.
दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या दरम्यान त्यांच्या निधनाच्या अनेक वेळा अफवा आल्या. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो या निधनाचे वृत्त फेटाळत त्यांची प्रकृती अगदी व्यवस्थित असल्याचे सांगत आजची सकाळ दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसाठी आणि चित्रपटसृष्टीसाठी वाईट उगवली. आज सकाळी दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिलीपकुमार यांचा जन्म पाकिस्तानमधल्या पेशावरमध्ये झाला होता. त्यांचं मुळ नाव मोहम्मद युसूफ खान असं होतं पण ते जगभर दिलीपकुमार नावानेच ओळखले गेले.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड जिंकण्याचं रेकॉर्डही दिलीपकुमार यांच्याच नावावर आहे. दिलीपकुमार हे फक्त अभिनेतेच होते असं नाही तर त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांनी केलेल्या मदतीची, दानशुरपणाचीही दखल जगानं घेतली.
हे ही वाचा:
भास्कर जाधव नरकासूर, तर उद्धव ठाकरे सोंगाड्या
१२ आमदारांच्या निलंबनाविरुद्ध भाजपाचे राज्यभर आंदोलन
अनिल देशमुखांच्या खासगी सहाय्यकांची कोठडी वाढविली १४ दिवसांनी
धर्मांतर केलेल्या हजारो हिंदू मुली दुबईच्या शेखला विकल्या का?
बॉम्बे टॉकिजनं १९४४ साली निर्माण केलेल्या ज्वार भट्टा सिनेमातून दिलीपकुमार यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केलं. तर १९९८ ला आलेला किला हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.
अंदाज, आन, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर असे काही सुपरहिट सिनेमे दिलीपकुमार यांच्या नावावर आहेत.