22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषज्येष्ठ आयुर्वेदाचार्य पी. के. वॉरिअर यांचे निधन

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य पी. के. वॉरिअर यांचे निधन

Google News Follow

Related

जगभरातील आयुर्वेद औषधे आणि उपचाराला लोकप्रिय करणारे डॉ. पी. के. वॉरिअर यांचे शनिवारी मलप्पुरम जिल्ह्यातील कोट्टाक्कल येथील निवासस्थानी निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. वॉरियर हे कोटक्कल आर्य वैद्य शाळा या प्रख्यात आयुर्वेद उपचार केंद्र आणि  आयुर्वेद औषध उत्पादक यांचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते. ८ जून रोजी त्यांनी आपला १०० वा वाढदिवस साजरा केला. सध्या कोरोनामुळे त्यांनी  वैयक्तिक वैद्यकीय सल्ला देणे टाळत होते. डॉ. वॉरिअर हे आर्य वैद्य शाळेचे संस्थापक ‘वैद्यरत्नम’ पीएस वॉरिअर यांचे पुतणे होते. १९९९ मध्ये देशाने त्यांना पद्मश्री आणि २०१० मध्ये पद्मभूषणने सन्मानित केले होते. थलाप्पानाथू श्रीधरन नामबोथीरी आणि कुंजी वरसियार या सहा मुलांमध्ये डॉ. वॉरियर सर्वात  लहान होते.

अभियंता होण्याची आकांक्षा असूनही, त्यांनी कौटुंबिक परंपरेचे पालन केले. काका ‘वैद्यरत्नम’ डॉ. पी. एस. वॉरिअर यांच्यासोबत आयुर्वेदाचा अभ्यास करण्यास  सुरुवात केली.  त्यांनी आयुर्वेदाच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाचा नारा दिला होता. डॉ. पी के वॉरिअर या चळवळीने प्रेरीत झाले आणि त्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी घर सोडलं.

हे ही वाचा:

२४ तासांत मालिकेच्या वेळापत्रकात दोनदा बदल

लवकरच १५% नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी?

जरंडेश्वर साखर कारखान्यानंतर सातारा जिल्हा बँकेचा नंबर?

उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयक?

डॉ. पी. के. वॉरिअर यांनी आपल्या आयुर्वेदाच्या अभ्यासाची सुरुवात आर्य वैद्य शाळेच्या किचनमध्ये सहायक म्हणून केली. त्यावेळी त्यांना ११२ रुपये दरमहा पगार मिळायचा. या पगारात त्यांचा महागाई भत्ताही समाविष्ट असायचा.  अखिल भारतीय आयुर्वेद परिषदेने त्यांच्या ऋषितुल्य कर्तृत्वासाठी १९७७ मध्ये आयुर्वेद महर्षी हा सन्मान देऊन गौरव केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा